मानोरा – गत दोन दिवसांपासून मानोरा तालुक्यात मुसळधार
पावसाने झोडपून काढल्याने नदी-नाल्यांना आलेल्या पुरामुळे
शेतकऱ्यांच्या शेतीला मोठा फटका बसला आहे.
या परिस्थितीत आमदार सई प्रकाश डहाके यांनी
आज प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा दिला.
गुरुवार आणि शुक्रवार या दोन दिवसांत झालेल्या मुसळधार
पावसामुळे तालुक्यातील अरुणावती, खोराडी, अडान,
धावंडा आणि इतर भागातील सोयाबीन, कपाशी, तूर
यांसारख्या पिकांना मोठा नुकसानीचा सामना करावा लागला.
आमदार सई प्रकाश डहाके यांनी महसूल कृषी पंचायत विभागाचे
अधिकारी व कर्मचारी सोबत घेऊन कार्ली,
तळप, यशवंत नगर, सेवादास नगर या भागातील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली.
या दौऱ्यात तालुक्यातील जेष्ठ नेते महादेवराव ठाकरे,
मंडळ अध्यक्ष अरविंद इंगोले पाटील, डॉ. सुहास देशमुख, राजू देशमुख,
नेमिचंद राठोड आणि मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते.
पाहणी दरम्यान आमदारांनी प्रशासनाला तातडीने पंचनामे
करण्याचे आदेश दिले आणि शेतकऱ्यांच्या तातडीच्या
मदतीसाठी आवश्यक ती सर्व प्रशासनिक पावले उचलण्यास सांगितले.
Read also : https://ajinkyabharat.com/fulumari-someshwar-nagar-pool-dhokadayak-tatdin-naveen-pool-ughanichi-magani/