अकोला | प्रतिनिधी
अकोला शहराच्या उत्तरेकडील प्रवेशद्वार असलेल्या अकोट फाईल परिसरात आज एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर अकोट फाईल पोलीस स्टेशनचे ठाणेदार शेख
साहेब यांच्याशी थेट भेट घेऊन आमदार रणधीर सावरकर यांनी नियोजनावर सविस्तर चर्चा केली.
अकोट फाईल पोलीस ठाण्याच्या हद्दीतून मार्गस्थ होणाऱ्या कावड यात्रा महोत्सवाच्या अनुषंगाने ही भेट अत्यंत महत्त्वाची ठरली.
या दरम्यान आमदार सावरकर यांनी नागरिकांकडून आलेल्या सूचना,
अडचणी यांची सविस्तर माहिती घेतली आणि त्यावर योग्य योजना आखण्याचा विश्वास दिला.
आगामी काळात कोणत्याही नागरिकाला अडचण निर्माण होणार नाही याची दक्षता घेत,
प्रशासन व पोलीस यंत्रणेसोबत सुसंवादातून शांतता आणि सुव्यवस्थेसाठी आवश्यक
ती पावले उचलली जातील, असे आश्वासन आ. सावरकर यांनी दिले.
Read Also : https://ajinkyabharat.com/2007-malegaon-bomb-splash/