भीषण अपघातात युवक युवती जागीच ठार*

– मारेगाव नजीकच्या घटनेने पंचक्रोशीत शोककळा

 

 


मारेगाव–वणी मार्गावर तुळशीराम बारसमोरील राज्य महामार्गांवर झालेल्या भीषण अपघातात दोन तरुण युवक युवती ठार झाल्याची घटना आज शनिवारी रात्री साडेआठ वाजताचे दरम्यान घडली. या दुर्देवी घटनेने मारेगाव तालुक्यात पुरती शोककळा पसरली आहे. गौरव बापूराव आत्राम (23 वर्षे) रा. गौराळा व नमेश्वरी राजेंद्र हनुमंते (17 वर्षे)रा. बोपापूर (कायर) ह. मु. मारेगाव असे अपघातात मृत्यू झालेल्यांचे नाव आहे.
हे दोघेही तरुण-तरुणी स्कूटीने वणीवरून मारेगावच्या दिशेने येत होते. विरुद्ध दिशेने भरधाव वेगात येणाऱ्या आयसर ट्रकशी स्कूटीची समोरासमोर टक्कर झाली. धडक इतकी भीषण होती की स्कूटी थेट ट्रकच्या चाकांमध्ये अडकून काही मीटरपर्यंत ओढत नेली गेली. या दुर्घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेनंतर ट्रक चालकाने त्वरित वाहन थांबवून पोलिसांना माहिती दिली.
दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरु आहे.
या हृदयद्रावक घटनेने पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे.परिणामी, मृत युवक दहावी झाला होता तर युवती ही बारावी ला मारेगाव येथे शिक्षण घेत असल्याची माहिती आहे.