RTI कार्यकर्ते विजय कुंभार यांचा खळबळजनक दावा
गेल्या काही दिवसांपासून राज्यात सर्वतोमुखी चर्चेचा विषय झालेल्या
पूजा खेडकर प्रकरणानंतर असाच काहीसा खळबळजनक प्रकार पुढे आला आहे.
Related News
धोंडा आखर येथे ‘प्रधानमंत्री धरती आबा’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
परशुराम नाईक विद्यालयाचे तंबाखू मुक्त अभियान कौतुकास्पद – न्यायाधीश आर. एन. बंसल यांची प्रशंसा
बोर्डी ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार : सांडपाण्यामुळे नागरिक त्रस्त
इंझोरी महसूल मंडळात २०० एकरांवर दुबार पेरणीचे संकट
“आपके नाम से हर शख्स…” शिंदेंचा शेर आणि ‘जय गुजरात’ घोषणेने चर्चांना उधाण!
सेंट पॉल्स अकॅडमी ,अकोट येथे शाळेचा स्थापना दिवस उत्साहात साजरा
गजानन नागरी पतसंस्थेत मोठा आर्थिक गैरव्यवहार? ठेवीदारांची गर्दी, उपनिबंधकांकडे तक्रार
शाळेचा पहिला ‘आनंददायी’ दिवस !
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात :
नागपूरमध्ये वैद्यकक्षेत्राची क्रांती : कॅन्सरमुळे लिंग गमावलेल्या रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया
शास्ती पुर्ण माफ करण्याचा प्रस्ताव पाठवा
बार्शीटाकळी तहसील कार्यालयात संत सेवालाल महाराज बंजारा/लभाण तांडा समृद्धी योजनेच्या समित्यांची बैठक
देशातील एकूण 22 UPSC चे आधिकारी बोगस असल्याचा दावा
RTI कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केला आहे. एवढेच नाही तर
या 22 अधिकाऱ्यांची नावे असणारी एक डॉक्युमेंट UPSC FILES नावाने
सोशल मीडियावर फिरत असून ती यादी देखिल विजय कुंभार यांनी समोर आणली आहे.
याबाबत UPSC आयोगाला पत्र लिहून, या सर्व अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी,
या अधिकार्यांना ज्यांनी मदत केली त्यांची देखील चौकशी करून
कारवाई करण्याची मागणी विजय कुंभार यांनी केली आहे.
या 22 मधील पुणे शहरातील एक अधिकारी असून राज्यातील देखील एकूण चार अधिकारी
असल्याचा दावा केला जातोय. इतकच नाही तर हे सर्व आधिकारी राज्यात
IAS, IPS आणि IRS म्हणून कार्यरत असल्याचेही विजय कुंभार यांनी सांगितलंय.
अलीकडे उघडकीस येणारे गैरप्रकार लक्षात घेता या सर्व प्रकाराचा फटका
प्रामाणिक विद्यार्थ्यांना बसतो आहे. या संपूर्ण प्रकारात काही प्रकरण असे देखील
आहे की त्यांनी दिव्यांग असल्याचे बनावट सर्टिफिकेट जमा केले आहे
आणि त्यानंतर त्यांचेच काही व्हिडिओ समाज माध्यमांवर नाचताना दिसले आहेत.
इतका गंभीर प्रकार हा अद्याप कुणाच्याही लक्षात आला नाही, असं म्हणता येणार नाही.
तर हे प्रकरण काहींच्या लक्षात आले असून देखील त्यांनी जाणीवपूर्वक
याकडे दुर्लक्ष केल्या असल्याचं पण बोलायला जागा आहे.
यात अनेक पदांची अशाच प्रकारे निवड झाल्याचेही विजय कुंभार म्हणाले.
एकट्या महाराष्ट्रात अशा प्रकारची चार प्रकरण उजेडात आली आहे.
ही लोक राज्यात काम करत नसली तरी ते राज्याबाहेर काम करत आहेत.
त्यामुळे यूपीएससीने या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता यात हस्तक्षेप करून
वेळीच यावर कारवाई करून योग्य ते पाऊल उचलावे, असे आवाहन ही त्यांनी केले आहेत.
Read also: https://ajinkyabharat.com/who-is-the-chief-ministerial-face-of-mahavikas-aghadi-nana-patoleni/