बाळापूर : तालुक्यातील वाडेगाव येथे स्टेट बँक ऑफ इंडिया समोर घडलेल्या धक्कादायक चोरीप्रकरणाने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. दिनांक 18 नोव्हेंबर रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडलेल्या या प्रकारात 2 लाख 80 हजार रुपये क्षणार्धात लंपास करण्यात आल्याची माहिती समोर आली असून संपूर्ण प्रकरण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचे प्राथमिक तपासातून स्पष्ट झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वाडेगाव येथीलच 40 वर्षीय शेख मुद्दसिर शेख असलम कुरेशी यांनी SBI बँक आणि त्याच शेजारील एटीएममधून मिळून 2 लाख 80 हजार रुपये काढले. त्यांनी पैसे ठेवलेली पिशवी गाडीच्या पुढील भागावर ठेवून निघण्याची तयारी सुरू केली असतानाच तोंडाला रुमाल बांधून तीन ते चार संशयित युवक त्यांच्या जवळ आले.
“तुमचे काही पैसे खाली पडलेत,” असे सांगत त्यांनी लक्ष विचलित केले. पीडित व्यक्ती गाडीकडे पाहण्यासाठी खाली उतरले तोच बाजूलाच उभे असलेले दुसरे युवक गाडीवरील पैशांची पिशवी उचलून पोबारा करत पळून गेले. हा प्रकार बँकेसमोर उसळलेल्या गर्दीतच घडला.
Related News
अजित पवारांच्या शेवटच्या सीसीटीव्ही फुटेजवरून उठलेल्या शंका; सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया
अजित पवार यांच्या विमान अपघाताने संपूर्ण राजकीय विश्व हाद...
Continue reading
डोंबिवली पूर्वेकडील लोढा हेवन हायप्रोफाईल सोसायटीत एक भयंकर प्रकार घडला आहे. योगी कुटुंब आपल्या घराच्या पाठीमागील चेंबरची साफसफाई करत असत...
Continue reading
कल्याणमधून खळबळजनक बातमी समोर आली आहे. आंबिवली पाटील नगर परिसरात रात्रीच्या वेळी नागरिकांच्या घरांवर सुतळी बॉम्ब फेकल्याच्या घटना घडल्या आहेत...
Continue reading
अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरात दोन महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मृत व्यक्ती...
Continue reading
तालुक्यात विविध शैक्षणिक व आरोग्यविषयक उपक्रमांमध्ये आघाडीवर असलेल्या पीएम श्री जि.प. वरिष्ठ प्राथमिक शाळा, वाडेगाव येथे दि. ११ व १२ फेब्रुवारी रोजी दोन दिवसीय भव्य मोफत
Continue reading
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलम १५१ अंतर्गत जिल्हा परिषद अकोलाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम यांनी बाळापूर तालुक्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासकांच...
Continue reading
उरळ पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या हाता गावात अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री घरफोड्यांची मालिका राबवून गावात भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. दि. १६...
Continue reading
बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथे निगूर्णा नदी पात्रात उभारण्यात आलेल्या कोल्हापूरी बंधाऱ्याचे एक गेट अज्ञात व्यक्तींनी फोडल्याची गंभीर घटना समोर आ...
Continue reading
बाळापूर (तालुका प्रतिनिधी):तालुक्यातील उरळ-बु. गावात मोकाट व त्वचारोगग्रस्त कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे मानवी ...
Continue reading
धक्कादायक… Johannesburg जवळील टाउनशिपमध्ये अंदाधुंद गोळीबारात 10 जणांचा मृत्यू, 10 जखमी; रस्त्यावर गोळ्यांचा वर्षाव
दक्षिण आफ्रिकेतील Johannesburg
Continue reading
लग्न रद्द! रसगुल्ल्यांवरून भांडण, नवऱ्या व नवरीकडील घरात तणाव
लग्न समारंभ सोहळा हा अत्यंत आनंदाचा क्षण असतो. या क्षणाला संस्मरणीय करण्यासाठी असंख्य प्रयत्न केले जातात. डेस्टिनेशन ...
Continue reading
घटनेची माहिती मिळताच वाडेगाव पोलीस चौकीचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक संभाजी हिवाळे आणि त्यांचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बँकेतील सीसीटीव्ही फुटेज तपासून सविस्तर माहिती गोळा केली. तर बाळापूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे यांनीदेखील घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. वृत्त लिहेपर्यंत पोलिसांकडून पंचनामा सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.
एका महिन्यात दुसरी मोठी घटना ! गावात भीतीचं सावट
वाडेगाव परिसरात अशा प्रकारच्या चोरीच्या सलग घटना घडत असल्याने ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याच गावात साधारण महिन्याभरापूर्वी मटन विक्रेत्याच्या दुकानासमोर पातूर तालुक्यातील तुलंगा येथील बाळू मामनकार यांच्या दुचाकीवर ठेवलेली पैशांनी भरलेली पिशवी लंपास करण्यात आली होती. त्यात तब्बल 2 लाख रुपये गेले होते.
ताज्या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण अधिकच दाटले असून नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे. पोलिसांनी संशयितांचा तपास गतीने सुरू केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींच्या हालचालींचा शोध घेतला जात आहे.
read also : https://ajinkyabharat.com/delhi-blast-case-gruesome-conspiracy-exposed-shocking-revelation-by-accused-doctor-who-created-a-bloody-riot-using-signal-app/