अकोल्यात शिंदे सेनेच्या दोन गटांमध्ये वाद उफाळला

शिंदे

अकोला: नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या निकाल जाहीर झाल्यानंतर अकोल्यात शिंदे गटाच्या शिवसेनेतील अंतर्गत वाद पुन्हा उफाळून आला आहे. रविवारी रात्री अकोल्यातील आर. जे. हॉटेलमध्ये हा वाद प्रकट झाला. या वेळी मंत्री संजय राठोड उपस्थित होते.

घटनेत माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया आणि जिल्हाप्रमुख अश्विन नवले यांच्या समर्थकांमध्ये जोरदार तंटा झाला. या संघर्षाचे मुख्य कारण नगरपरिषद निवडणुकीतील जागा वाटप आणि नेतृत्वावर मतभेद असल्याचे सांगितले जाते.

नगरपरिषद निवडणुकीत शिंदे गटाला मोठे अपयश पत्करावे लागले असून फक्त आठ नगरसेवक निवडून आले आहेत. ही निवडणूक बाजोरिया यांच्या नेतृत्वाखाली लढविण्यात आली होती. परिणामी काही नेत्यांनी आगामी मनपा निवडणुकीची धुरा इतर स्थानिक पदाधिकाऱ्यांकडे सोपवण्याचा प्रस्ताव मंत्री राठोड समोर मांडला. यावरून दोन्ही गटांच्या समर्थकांमध्ये वाद उफाळला.

Related News

दोन्ही गटांचे समर्थक एकमेकांवर आरोप करत असून, घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मंत्री महोदयांनी ही परिस्थिती वरिष्ठांपर्यंत पोहोचवून योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले आहे.

read also : https://ajinkyabharat.com/municipal-elections-2025-congress-final-elections/

Related News