IND vs PAK: भारतानं पाकिस्तानला हरवताच IIT बाबांनी मारली पलटी,
विराट कोहलीच्या शतकाचं क्रेडिट स्वत: खाताहेत.
बरं, एवढंच नाही तर आता नवी भविष्यवाणी केलीये,
भारत फायनलमध्ये पोहोचणार नाही आणि पोहोचला तर जिंकणार नाही.
भारतानं पाकिस्तानचा पराभव केल्यापासून क्रिकेट फॅन्स IIT बाबांचा शोध घेत आहेत.
पाकिस्तान या चॅम्पियन ट्रॉफीमध्ये भारताचा पराभव करणार अशी खळबळजनक भविष्यवाणी त्यांनी केली होती.
अर्थात ही गोष्ट भारतीय फॅन्सला नक्कीच आवडणारी नव्हती. त्यामुळे भारत जिंकताच सोशल मीडियावर एकच चर्चा आहे
Related News
अन् ती म्हणजे IIT बाबा. अन् या क्षणी लोकांच्या भावना इतक्या तीव्र आहेत की जर कुठे हे बाबा
क्रिकेट फॅन्सच्या तावडीत सापडले तर लोकं तुडवल्याशिवाय राहणार नाहीत.
असो, पण या मॅचच्या पार्श्वभूमीवर IIT बाबांचा आता एक नवा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
स्वत:ची भविष्यवाणी फेल झाल्यावर ते क्रिकेट फॅन्सची माफी मागतील अशी अपेक्षा बहुतांश लोकांना होती.
पण तसं काहीच घडलं नाही. उलट त्यांनी असं काही वक्तव्य केलं की जे ऐकून लोकं आणखी खवळून उठतील.
चला पाहूया भारतानं पाकिस्तानला हरवल्यानंतर IIT बाबांनी दिलेली प्रतिक्रिया.
हा व्हिडीओ sunilkumarindiaa या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही तो तरुण पाहू शकता ज्याच्यासोबत लईव्ह स्ट्रीम करताना IIT बाबांनी
भारताच्या पराभवाची भविष्यवाणी केली होती. त्या तरुणानं भारत
जिंकताच बाबांना फोन केला आणि त्यांची प्रतिक्रिया घेतली.
तो म्हणाला, बाबा भारतानं मॅच जिंकल्यापासून लोकं मला फोन करून आणि कमेंट
सेक्शन शिव्यांची लाखोली वाहात आहेत. यावर तुमचं मत काय आहे?
यावर बाबा म्हणाले, मी या मॅचसाठी म्हणालो नव्हतो. खरं तर या वक्तव्यावर
स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. मला पकडून लोकांना काहीच मिळणार नाही.
कदाचित भारताचा जो विजय झालाय तो माझ्यामुळेच झालाय. तुम्हाला कसं माहिती हा विचार मी केला नव्हता.
बााबांच्या या प्रतिक्रियेवर तरुण म्हणाला, भारत जर फायनलमध्ये पोहोचला तर आपण आणखी एक लाईव्ह करू.
यावर बाबा म्हणाले, भारत फायनलमध्ये पोहोचेल असं वाटत नाही. भारत मला फायनल
मॅचमध्ये खेळताना दिसत नाहीये. मला तसे इंट्युशन येत आहेत. कदाचित
भारत जिंकेल सुद्धा मी फक्त माझे इंट्युशन लोकांना सांगितले.
IIT बाबांचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल होतोय. यामध्ये ते म्हणाहेत,
“मी असंच काहीपण फेकत असतो. तुम्ही माझं बोलणं इतकं गांभिर्यानं का घेता?”