मुंबईत वाढत्या उष्णतेमुळे आणि कमी झालेल्या पाऊस पावसामुळे सातही धरणांतील पाणीसाठा अर्ध्यावर आला आहे.
मुंबई महापालिकेने पाणी जपण्याचे आवाहन केले आहे आणि पाणी कपात होण्याची शक्यता वर्तवली आहे.
उन्हाळ्यात पाण्याचे बाष्पीभवन वाढल्याने ही समस्या आणखी चिंताजनक होऊ शकते.
Related News
मुजफ्फरनगर (उत्तर प्रदेश),
उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर येथे ११ जुलैपासून सुरू होणाऱ्या कांवड यात्रेमुळे दिल्ली-देहरादून
राष्ट्रीय महामार्ग व गंगा कालवा मार्गावर वाहतुक...
Continue reading
अकोला,
अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोरील आर्थिक व व्यवस्थापकीय अडचणींमुळे आत्महत्येचे संकट दिवसेंदिवस वाढत चालले आहे.
यंदा केवळ जानेवारी ते जून २०२५ या कालावधीत ८० शेतकऱ्यांनी आत...
Continue reading
ठाणे |
मराठी हक्कासाठी निघालेल्या मोर्चात पोलिसांनी अडथळा आणल्याने मनसे नेते अविनाश जाधव यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
“आम्ही आतंकवादी आहोत की दहशतवादी?” असा थेट सवा...
Continue reading
चंदन जंजाळ
बाळापूर:- तालुक्यातिल निबां फाटा वर अवैद्य धंदे मोठ्या प्रमाणात जोर दरत आहे.
कुठे गावात तर कुठे शाळेच्या प्रणागणा तर काही ठिकाणी गावामध्ये गावठी दारु चे खुलेआम वि...
Continue reading
नवी दिल्ली | प्रतिनिधी
अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा BRICS देशांवर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ लावण्याची धमकी दिली आहे.
"जो कोणी ब्रिक्सच्या अमेरिका-विरोधी ...
Continue reading
प्रतिनिधी आलेगांव
आषाढी एकादशी म्हणजे भक्ती, श्रद्धा आणि विठ्ठलनामाच्या गजराने भारलेला दिवस! याच दिवशी शेकापूर फाट्यावरील
कै. हरसिंग नाईक प्राथमिक आश्रम शाळा, श्री. सुधाकरराव...
Continue reading
आलेगाव दिनांक ५ प्रतिनिधी आलेगाव ते बाभुळगाव रस्त्यावरील कार्ला लगत रस्त्यावर मोठ,
मोठे खड्डे पडले असून जड वाहनांच्या दळण वळणाने सडकेच्या दोन्ही कडच्या कडा खचून १२ ते १८ इंचाचे
...
Continue reading
अकोला | प्रतिनिधी
आज दिनांक ७ जुलै २०२५ रोजी अकोला रेल्वे स्टेशन परिसरात हवामानामुळे अचानक निंबाच्या झाडाची मोठी फांदी
तुटल्याने झाडावर वास्तव्यास असलेले सुमारे ६० बगळे – पिल्ले ...
Continue reading
कुरणखेड - राष्ट्रीय महामार्गावर रोज अपघाताची मालिका सुरूच आहे बोरगाव मंजू पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत .
असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर डाळंबी जवळ आज दुपारी अपघात झाला यामध्ये का...
Continue reading
मुर्तिजापूर | शहरातील मध्यवर्ती बसस्थानकावर सोमवारी सकाळच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली.
मागून खाणाऱ्या व बेवारस अवस्थेत वावरत असलेल्या एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह थेट बसस्थ...
Continue reading
प्रतिनिधी | आकोलखेड
आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर अकोलखेड येथील श्री विठ्ठल मंदिरात गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात पार पडला.
गुण गौरव सोहळा आयोजन समितीतर्फे आयोजित या ...
Continue reading
अकोला | प्रतिनिधी
अकोल्याच्या ऐतिहासिक आणि १३५ वर्षे जुन्या कच्छी मशीदने तंत्रज्ञानाशी जुळवून घेत एक अभिनव उपक्रम सुरू केला आहे.
'कच्छी मशीद अजान ॲप'च्या माध्यमातून अजान आता थेट...
Continue reading
मुंबईत गेल्या काही दिवसापासून उन्हाचा ताप वाढला आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या जीवाची काहिली होत आहे.
तर दुसरीकडे कडक उन्हामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा अर्ध्यावर आला आहे.
मार्च सुरू होण्याआधीच पाणीसाठा अर्ध्यावर आल्याने मुंबई महापालिकेने मुंबईकरांना
पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे. पाऊस जूनमध्ये सुरू होत असला तरी साधारण पावसाचे आगमन
जूनच्या अखेरीस किंवा जुलैमध्ये होत असते. त्यामुळे तोपर्यंत पाणीसाठी
पुरावा म्हणून महापालिकेला मोठी कसरत करावी लागणार आहे.
पाणी टंचाईची शक्यता ओळखून येत्या काळात महापालिका पाणी कपात करण्याचेही संकेत मिळत आहेत.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, मोडकसागर,
भातसा, तानसा, तुळशी आणि विहार या सात धरणांतून दररोज 3 हजार 950 दशलक्ष लिटर
पाणीपुरवठा केला जातो, मुंबईची वर्षभराची तहान भागवण्यासाठी सातही धरणांत 14 लाख 47 हजार 343
दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते. जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत थंडी असते, मात्र यंदा फेब्रुवारी
महिन्यातच उकाड्याने मुंबईकर हैराण झाले आहेत. उन्हाळ्यात पाण्याचे बाष्पीभवन होण्याचे प्रमाण वाढते.
त्यामुळे धरणातील पाण्याच्या पातळीत आणखी घट होण्याची शक्यता आहे. आताच हा पाणीसाठा
अर्ध्यावर आल्याने महापालिकेने मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे.
23 फेब्रुवारीला जलसाठा उपलब्ध (दशलक्ष लिटर)
अप्पर वैतरणा – 1,63,299
मोडकसागर – 25,316
तानसा – 63,612
मध्य वैतरणा – 98,803
भातसा – 3,75,432
विहार – 16,438
तुळशी – 4,535
उद्यापासून तापमान वाढणार
दरम्यान, मुंबईत काही दिवसांपासून उन्हाचा ताप जाणवू लागला असून मंगळवारपर्यंत मुंबईचे तापमान
आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सांताक्रूझ येथे कमाल तापमान रविवारी 37.2 अंश
सेल्सिअस नोंदवले गेले आहे. तापमानातील वाढीबरोबरच वाढत्या आर्द्रतेमुळे उष्मा अधिक प्रमाणात जाणवेल,
असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात रविवारी 35 अंश सेल्सिअस,
तर सांताक्रूझ केंद्रात 37.2 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे.
Read more news here :https://ajinkyabharat.com/na-boni-na-mithun-or-superstarsathi-sridevine-paavala-is-4-days-fast/