मुंबईत १४ हजार कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या सागरी किनारा
मार्गाला (कोस्टल रोड) तडे गेल्यानंतर शिवसेना उबाठा
पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.
मुंबई : मुंबईत १४ हजार कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या सागरी किनारा मार्गाला (कोस्टल रोड)
तडे गेल्यानंतर शिवसेना उबाठा पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.
‘मिंधे व त्यांचे लाडके कंत्राटदार केवळ रस्त्यावरचा मलिदा खाण्यात पटाईत आहेत,’
Related News
अशा शब्दांत आदित्य यांनी टीकास्त्र सोडले.सागरी किनारा मार्गाला तडे गेल्याने तसेच,
ठिकठिकाणी डांबराचे पॅच लावण्यात आल्याने महापालिका तसेच, राज्य सरकारवर विरोधकांनी टीका करायला सुरुवात केली आहे.
याचाच धागा पकडत आदित्य ठाकरे यांनी एक्स माध्यमावरून ही टीका केली.
‘आम्ही आधीच म्हटले होते, मिंधे जिथे जिथे हात लावतात तिथे तिथे कामे रखडतात,
खर्च वाढतात आणि कामाची मात्र वाट लागते. मिंधे व त्यांचे लाडके कंत्राटदार केवळ
‘रस्त्यावरचा मलिदा’ खाण्यात पटाईत आहेत.
कोस्टल रोडवर ‘हाजी अली ते वरळीपर्यंतच्या’ रस्त्यावर केलेले पॅचवर्क हे त्याचंच ढळढळीत उदाहरण आहे,’
असे आदित्य यांनी लिहिले आहे.

