(गरजूंनी लाभ घेण्याचे आवाहन)
आकोट
सद्गुरु श्री.संत वासुदेव महाराज यांच्या १०८ व्या जयंती महोत्सवाचे औचित्य
साधून रविवार दिनांक २३ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध
Related News
डॉक्टरांच्या उपस्थितीत निशुल्क भव्य आरोग्य तपासणी व रोगनिदान शिबिर संपन्न होणार आहे.
यामध्ये श्री.संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल,अमरावती द्वारा भव्य हृदयरोग तपासणी करिता
डॉ.शैलेश जायदे,डॉ.शिवराज शिंदे व संपूर्ण टीम प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे.
यांच्यासोबतच ऑर्थोपेडिक सर्जन डॉ.अमोल रावणकार,डॉ.विनोद कोल्हे
डॉ.नरेंद्र सरोदे डॉ.सौरभ बोचे फिजिशियन,हृदयरोग,दमा,थायरॉईडमधुमेह यांकरिता
डॉ.अशोक बिहाडे,डॉ.राम बिहाडे,डॉ.गौरी ठवळी,स्त्रीरोग तज्ञ डॉ.तायडे मॅडम,
डॉ.संजीवनी बिहाडे,डॉ.गुंजन वडणे,डॉ.कांचन भुईवार,डॉ.प्रियंका थोटे,
डॉ.जान्हवी सावरकर,नेत्र रोग तज्ञ ,डॉ. सुहास कुलट डॉ. सागर भुईभार डॉ. शिवानी बिहाडे डॉ. दर्शन कुलट
डॉ. विशाल वाघ डॉ. कलाल सर डॉ. ऐश्वर्या कुलट डॉ. शिवानी बिहाडे, संधिवात तज्ञ डॉ. आदित्य बुरजे,
बालरोग तज्ञ डॉ. नितीन गायकवाड डॉ. मदन महल्ले डॉ. कल्याणी महल्ले, छाती रोग चिकित्सक
डॉ. प्रतिक बिहाडे डॉ. सागर थोटे गॅस्ट्रोएंटेरोलॉजिस्ट डॉ. शिवाजी ठाकरे डॉ. परमेश्वर जुनारे त्वचारोग तज्ञ
डॉ. वैभव टापरे डॉ. अमृता मोरे डॉ. आरतीलता देशमुख (ठाकरे) न्यूरोफिजिशियन डॉ. सुमित खुपसे,
फिजिओथेरपी डॉ प्रणाली सु. फोकमारे आदी मान्यवर मंडळी निशुल्क सेवा या शिबिरामध्ये देत आहेत.
तसेच या शिबिरात सहभागी होणाऱ्या गरजू रुग्णांना पुढील उपचारादरम्यान विशेष सवलत देण्यात येईल.
तरी जास्तीत जास्त संख्येने रुग्णांनी या शिबिराचा अवश्य लाभ घेण्याचे आवाहन श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्था,
श्री क्षेत्र श्रद्धासागर, आकोट यांनी केले आहे.
असा होईल श्रींचा जयंती महोत्सव प्रारंभ
श्री संत वासुदेव महाराज यांच्या १०८ व्या जयंती महोत्सवानिमित्त श्रीक्षेत्र श्रद्धासागर येथे विविध धार्मिक,
सामाजिक, सांस्कृतिक, अध्यात्मिक, आरोग्य सेवा उपक्रम सुनियोजित आहेत. यामध्ये पहाटे काकडा,
सकाळी ज्ञानेश्वरी प्रवचन, श्रीगुरु संत वासुदेवजी महाराज चरित्र ग्रंथ पारायण, श्री ज्ञानेश्वरदास विरचित ग्रंथांवर निरूपण,
ज्ञानेश्वरी भावकथा निरूपण, सायंकाळी हरिपाठ, आरती, रात्री हरिकीर्तन असा भरगच्च कार्यक्रम सात दिवस
अन्नदानासह पार पडणार आहे.
Click here for more updates : https://ajinkyabharat.com/israel-bus-blast-pager-hallayacha-revenge/