“Israel Bus Blast: पेजर हल्ल्याचा बदला?”

"Israel Bus Blast: पेजर हल्ल्याचा बदला?"

‘पाच बॉम्बना एकसारखेच टायमर लावलेले होते’ सैन्य सचिवांकडून अपडेट घेत असून घटनांवर

आमची नजर आहे असं इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूच्या

कार्यालयाकडून सांगण्यात आलं.इस्रायल बॉम्बस्फोटाने हादरलं आहे.

Related News

तेल अवीव शहरात उभ्या असलेल्या तीन बसेसमध्ये एकापाठोपाठ एक बॉम्बस्फोट झाले.

हा दहशतवादी हल्ला असल्याचा अधिकाऱ्यांना संशय आहे.

या बॉम्बस्फोटात कोणी मृत किंवा जखमी झालेलं नाही.

युद्धविराम करारातंर्गत हमासने काल इस्रायलला चार मृतदेह परत केले.

इस्रायल त्या दु:खात असतानाच हे बॉम्बस्फोट झाले. या बॉम्बस्फोटांनी 2000

च्या दशकात पॅलेस्टिनी बंडखोरांकडून होणाऱ्या बॉम्बस्फोटांची आठवण करुन दिली.

पोलीस प्रवक्ते एएसआय अहरोनी यांनी सांगितलं की, ‘दोन अन्य बसमध्ये स्फोटकं सापडली.

पण तिथे स्फोट झाले नाहीत’ इस्रायली पोलिसांनी सांगितलं की, ‘पाच बॉम्ब

एकसारखेच टायमर लावलेले होते. बॉम्ब निकामी पथकाने

स्फोट होण्याआधीच हे बॉम्ब निष्क्रिय केले’कोणाला दुखापत झालेली नाही

हा चमत्कार आहे असं शहराच्या मेयर ब्रॉट म्हणाल्या.

रुट पूर्ण झाल्यानंतर बेसस तिथे उभ्या करुन ठेवल्या होत्या.

बस कंपनीच्या प्रमुखाने तात्काळ सर्व बस चालकांना जिथे आहे तिथे थांबण्यास

आणि बसची तपासणी करण्यास सांगितलं आहे. ज्या बस सुरक्षित आहेत,

त्या पुन्हा आपल्या मार्गावर रुजू झाल्यात. काही महिन्यांपूर्वी इस्रायलने लेबनानमध्ये

पेजर ब्लास्ट घडवून आणले होते. त्याचाच हा बदला म्हणून पाहिलं जातय.

कोणावर संशय?

सैन्य सचिवांकडून अपडेट घेत असून घटनांवर आमची नजर आहे

असं इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूच्या कार्यालयाकडून सांगण्यात आलं.

इस्रायलच्या अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी असलेल्या शिन बेटकडे चौकशीची जबाबदारी आहे.

“एकाच संशयिताने सर्व बसेसमध्ये बॉम्ब ठेवले की, अनेक संशयित आहेत हे शोधून काढलं पाहिजे”

असं पोलीस प्रवक्ते हॅम सरग्रोफ म्हणाले. बसमधील स्फोटकं

वेस्ट बँकमधल्या स्फोटकांशी मिळती-जुळती आहेत, असं पोलीस प्रवक्त्याने सांगितलं.

आम्ही आमच्या शहीदांचा बदला घेणं विसरणार नाही

हमासने 7 ऑक्टोबर 2023 रोजी केलेल्या हल्ल्यानंतर गाजामध्ये

विनाशकारी युद्धाची सुरुवात झाली. इस्रायली सैन्याने वेस्ट बँकमधील संशयित

पॅलेस्टिनी दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर वारंवार छापे मारले.

Click here for more updates : https://ajinkyabharat.com/iyatta-dahawichi-exam-aaj-paasun-suru/

 

 

 

 

 

 

 

Related News