सध्या बॉक्स ऑफिसवर छावा सिनेमा चांगलाच गाजतोय.
मात्र या सिनेमासंदर्भात एका मराठी अभिनेत्रीने तिला खटकणाऱ्या गोष्टी शेअर केल्या आहेत.
मुंबई- सध्या विकी कौशल आणि रश्मिका मंदाना स्टारर छावा हा सिनेमा बॉक्स ऑफिस गाजवत आहे.
गेल्या सात दिवसांमध्ये या सिनेमाने बक्कळ कमाई करून बॉक्स ऑफिसवर तर राज्य केलेच
पण शिवाय प्रेक्षकांच्या मनावरही हक्क गाजवला आहे. छत्रपती शिवरायांचा पुत्र छत्रपती संभाजी महाराज
Related News
शिक्षण क्षेत्रात नवचैतन्य! इंझोरी केंद्रातील मुख्याध्यापक
चर्चगेट स्थानकाबाहेर बेस्ट बसला आग;
गुलजारपुरा स्मशानभूमी मोजते अखेरच्या घटका
भारताला जपानकडून बुलेट ट्रेनची भेट! मुंबई-अहमदाबाद उच्चगती रेल्वे
अकोल्यात केंद्र सरकारविरोधात काँग्रेसचे तीव्र आंदोलन!
मेरठमध्ये धक्कादायक प्रकार : तरुणाची २५ वर्षांनी मोठ्या विधवा महिलेशी फसवून लग्न
राजस्थानमध्ये भीषण अपघात; वरात घेऊन जाणारी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक….
अकोल्यात पाणी प्रश्न पेटला; शिवसेनेचा जलप्रदाय विभागात घागर मोर्चा, तोडफोड
कोल्हापुरात फुटबॉल सामन्यादरम्यान आयोजकांना पाच हजारांचा दंड
राजकोटमध्ये अपघात; ४ जणांचा मृत्यू, संतप्त नागरिकांचा रस्तारोको
जिल्हा परिषद अकोला : अधिकारी–कर्मचारी, जनतेत तीव्र नाराजी
सुदैवाने जीवितहानी टळली….
यांच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशाविदेशात गाजतोय.
मात्र अशातच एका मराठी अभिनेत्रीची छावा साठीची पोस्ट सध्या खूप व्हायरल होत आहे
. या पोस्टमध्ये तिने तिला सिनेमात खटकलेल्या गोष्टी नमूद केल्यात.
नवरी मिळे हिटलरला या मालिकेत लीलाला त्रास देणाऱ्या श्वेताचे पात्र साकारणारी
अभिनेत्री अक्षता आपटे हिने एक पोस्ट शेअर केली आहे. तिने लिहिले की,
छावा बद्दल बोलायचं झालं तर हा सिनेमा आपण एकदाच पाहू शकतो असा आहे.
जे आपल्याला आधीच माहिती आहे तेच दाखवले. पहिला भाग एवढं काही नाही,
पण दुसरा भाग छान आहे. सिनेमॅटोग्राफी उत्तम आहे पण स्क्रिप्ट चांगली नाही.
सिनेमाचं म्युझिक म्हणजे बिग नो… अजिबात चांगल नाही. दिग्दर्शन चांगलं पण आहे आणि वाईट पण.
कॉस्च्युम आणि हेअर मेकअप फार छान आहे. विकी कौशलने खूप उत्तम भूमिका साकारली आहे.
अक्षय खन्ना सुद्धा विकी कौशलच्या तोडीस तोड अभिनय करतोय. पण रश्मिका मंदाना यासाठी अजिबात योग्य नाही.
बाकीचे सहाय्यक कलाकार उत्तम आहेत.
एकंदरीत मनोरंजन म्हणून पाहण्यासाठी हा एक चांगला सिनेमा आहे.
छत्रपती संभाजी महाराजांना ज्या परिस्थितीतून जावं लागलं त्याबद्दल अजून जाणून घ्यायच्या अपेक्षा होती.
इतर प्रेक्षकां प्रमाणेच मला सुद्धा शेवटचा क्षण पाहून खूप रडू आलं पण
चित्रपटाच्या प्रभावामुळे असं झालेलं नाही. आपण महाराजांचा आदर करतो
म्हणून आपल्या भावना दाटून आल्या. दुर्दैवाने सिनेमात रश्मिकाचा तोच एक्सेंट ऐकायला येतो.
Read more here : https://ajinkyabharat.com/plastic-dubious-grain-arogyasathi-deadly/