अज्ञात वाहनाच्या धडकेत मधापुरी येथील दोन जण जागीच ठार.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 कुरुमच्या उड्डाणपूलावरील घटना.
गावात शोक कळा.
माना पोलीस स्टेशनच्या हद्दीतील राष्ट्रीय महामार्गावरील कुरुम येथील उड्डाणपुलावर
दुचाकीने प्रवास करणाऱ्या दोन इसमाला अज्ञात वाहनाने जोरदार दिलेल्या धडकेत जागीच ठार झाल्याची घटना १६ फेब्रुवारी
Related News
कांवड यात्रेमुळे दिल्ली-देहरादून राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद; ११ जुलैपासून नियमन लागू
अकोला जिल्ह्यात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची संख्या ८० वर; २५ वर्षांत ३१९७ शेतकरी मृत्यूचे भीषण वास्तव
“आम्ही आतंकवादी की दहशतवादी?” – अविनाश जाधव यांचा पोलिसांवर संताप
उरळ पोलिसांची जुगार अड्यावर धाड!
ब्रिक्सवर ट्रम्प यांचे टॅरिफ बॉम्ब; भारतालाही फटका बसणार का?
“वारीच्या वाटेवर शाळेचा उत्सव; भक्तिरसात न्हाल्या चिमुकल्या भावना”
आलेगाव बाभुळगाव रस्ता बनला अपघाताचा
रेल्वे स्थानकावर निंबाच्या झाडाची फांदी तुटली, वन्यजीव सेवेमुळे वाचले साठ बगळे!
महामार्गावर डाळंबी जवळ कार पलटी एक जखमी
मुर्तिजापूर बसस्थानकावर अनोळखी व्यक्तीचा मृतदेह! परिसरात एकच खळबळ, ओळख अद्यापही गूढ!
अकोलखेड येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
अकोल्यातील १३५ वर्षांची ‘कच्छी मशीद’ आता डिजिटल; ‘अजान’ थेट मोबाईलवर ऐकता येणार!
रोजी रात्री सव्वा आठ वाजताच्या दरम्यान घडली आहे . मृतकाचे नाव पिंटू सुखदेव सोनोने ( ४०) व
बाळू बबन गहुरकर (४७) दोघेही रा.मधापुरी येथील नागरिक असल्याचे समजते.
माना येथून जवळच असलेल्या मधापुरी येथील मृतक दोन इसम हे कुरुमला आठवडी बाजारात आले असता
गावी परत जायसाठी पेट्रोल पंपावरून पेट्रोल भरून उड्डाणपूलावरून जातेवळी विरुद्ध दिशेने
अमरावतीकडून अकोल्याकडे जाणाऱ्या अज्ञात वाहनाच्या जोरदार मारलेल्या धडकेत
पिंटू सुखदेव सोनोने व बाळू बबन गहुरकर हे दुचाकी क्र एम एच २७ टि ७०५४ या वाहनाने जात असताना जागीच गतप्राण झाले .
अपघाताची माहिती माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरज सुरोशे यांना मिळताच त्यांनी उपनिरीक्षक गणेश महाजन ,
सहायक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वानखडे ,अंमलदार अविनाश बोरसे , दिपक सोळंके ,
उमेश हरमकर, पो का आकाश काळे , ललीत बनचरे , अक्षय आगलावे यांना घटनास्थळी रवाना केले ,
त्यांनी पोहचून वाहतूक व्यवस्था सुरळीत करीत दोन्ही प्रेताचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी
मूर्तिजापूर येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा सामान्य रुग्णालयात रवाना केले .
पोलीस हे अज्ञात वाहनाचा सुगावा लागावा म्हणून राष्ट्रीय महामार्गावरील कुरणखेड येथील टोलनाका
, हाटेल तसेच धाब्यावर असलेले सीसीटीव्ही पडताळणी करीत असल्याची माहिती माना पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक गणेश महाजन यांनी दिली .
सदरच्या अपघाताची बातमी लिहेस्तोर माना पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला नव्हता .
अधिक बातम्या करीता येथे क्लीक करा
https://ajinkyabharat.com/mala-marathi-yait-naahi-jaa-majhi-takrar/