आतापर्यंत साप साप म्हणून भुई थोपटणारे भाजपा आमदार सुरेश धस
गेल्या दोन दिवसात पुरते अडचणीत सापडले आहे.
विरोधकांच्या आरोपानुसार,
बीडमध्ये धनंजय मुंडेंविरोधातील त्यांची भूमिकाच संशयाच्या फेऱ्यात सापडली आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख
यांच्या निर्घृण हत्येचे रक्त अद्याप सुकले नाही,
Related News
तोच याप्रकरणात मोठी भूमिका घेणारे आमदार सुरेश धस मोठ्या अडचणीत सापडले आहेत.
आतापर्यंत साप साप म्हणून भुई थोपटणारे भाजपा आमदार सुरेश धस गेल्या दोन दिवसात पुरते अडचणीत सापडले आहे.
विरोधकांच्या आरोपानुसार, बीडमध्ये धनंजय मुंडेंविरोधातील त्यांची भूमिकाच संशयाच्या फेऱ्यात सापडली आहे.
काँग्रेसचे नवीन प्रदेशाध्यक्ष बंटीदादांनी आमदार धसांवर सडकून टीका करतानाच एक खळबळजनक दावा केला आहे.
त्यामुळे महायुती धर्मावरच संकट ओढावले आहे.
आता मांडवली शब्दाचा जागर
“पहिले आगा आगा आगा, बंदूक बंदूक बंदूक, रेती रेती रेती, टिप्पर टिप्पर टिप्पर असे शब्द रांगड्या भाषेत मांडल्या जात होती.
मात्र आता हे शब्द मागे पडलेत आणि आता मांडवली मांडवली मांडवली, या शब्दाची गुंज या प्रकरणातून ऐकू येत आहे.”,
असा घणाघात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी घातला. त्यांनी आमदार सुरेश धसांवर गंभीर आरोप केले आहेत.
अन् केला तो गौप्यस्फोट
संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडमधील, विशेषतः परळीमधील अनेक प्रकरणं एकामागून एक समोर आले.
खंडणी, घोटाळे, खूनाची मालिकाच समोर आली. मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात आमदार,
त्यांच्या पक्षातील बड्या नेत्यांनी मोठी टीका केली. आमदार सुरेश धस यांनी तर आका आणि आकाचे आका असा धोसा लावला होता.
पण त्यानंतर सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची अशात झालेली भेट, सर्वांनाच धक्का देणारी होती.
त्यावर आता काँग्रेसमधून सुद्धी तीव्र प्रतिक्रिया आली आहे. मुंडे यांच्याविरोधातील आरोप का करण्यात येत होते,
याविषयी हर्षवर्धन सपकाळ यांनी मोठा गोप्यस्फोट केला आहे.
“टीआरपी
वाढवण्याकरता केलेला हे सगळं प्रकरण होतं राष्ट्रवादी काँग्रेसला महत्त्व कमी करण्याकरता भाजपच्या
मुख्यमंत्र्यांनी आमदार धस यांना दिलेली सूचना होती.” असा खळबळजनक दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी केला.
त्यांच्या या आरोपामुळे महायुती धर्मावरच संकट आल्याचे समोर येत आहे.
महायुतीत भाजप इतर पक्षांना बदनाम करत असल्याचा अप्रत्यक्ष टोला सपकाळ यांनी लगावला आहे.
मला बदनाम करण्याचा प्रयत्न -धस
धनंजय मुंडे यांच्यासोबत झालेल्या भेटीनंतर सुरेश धस यांनी हा त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला.
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही भेट घडवून आणली होती. ही बैठक चार तास चालल्याचे समोर आले आहे.
त्यानंतर सुरेश धस यांच्यावर टीकेची झोड उठली. ज्या व्यक्तीने आपल्या बदनामीचा प्रयत्न केला.
त्याचे नाव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर घालणार असल्याचे धस म्हणाले.