अकोल्यात बांगलादेशी नागरिकांचा अवैध वावर? किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

अकोल्यात बांगलादेशी नागरिक अवैधपणे राहत असल्याचा किरीट सोमय्या यांचा गंभीर आरोप;

 

अकोल्यात बांगलादेशी नागरिकांचा अवैध वावर? किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

रामदासपेठ पोलीस ठाण्यात 80 जणांविरोधात तक्रार दाखल, पोलिस कारवाईला सज्ज

Related News

अकोला, दि. ६ – अकोला शहरात मोठ्या प्रमाणावर बांगलादेशी नागरिक अवैधरित्या राहत असल्याचा गंभीर आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.

सोमय्या यांनी यापूर्वीच 12 जणांविरोधात तक्रार केली होती, ज्यामधून दोन जणांना अटक करण्यात आली.

मात्र, आज त्यांनी नव्या तक्रारीसह तब्बल 80 संशयितांची यादी पोलिसांना सादर केली आहे.

रामदासपेठ पोलीस ठाण्यात सोमय्या यांनी दिलेल्या तक्रारीवर FIR दाखल करण्यात आला असून, यासोबतच 80 पुरावेही पोलिसांना सुपूर्द करण्यात आले आहेत.

बनावट आधार कार्ड व जन्म दाखल्याचा घोटाळा? सोमय्या यांनी आरोप केला आहे की, तहसीलदार कार्यालयाच्या मदतीने बेकायदेशीररित्या

बनावट आधार कार्ड व जन्म दाखले तयार करून बांगलादेशी नागरिकांना भारतात स्थायिक केले जात आहे.

यामध्ये काही शासकीय अधिकारीही सामील असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

फॉरेन्सिक ऑडिटर नेमण्याचा इशारा या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी फॉरेन्सिक ऑडिटर नेमण्याचा अधिकार पोलिसांना दिला जाईल,

असेही सोमय्या यांनी स्पष्ट केले. जर जिल्हाधिकारी व इतर अधिकारी योग्य कारवाई करत नसतील, तर त्यांच्यावरही कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

काही तहसीलदार जाणार थेट जेलमध्ये – किरीट सोमय्या

सोमय्या यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “बनावट कागदपत्रांची निर्मिती तहसीलदारांच्या मदतीशिवाय शक्य नाही. यामुळे काही तहसीलदार लवकरच जेलमध्ये जातील.”

त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांवरही टीका करत सांगितले की, “जर त्यांनी गांभीर्याने काम केले नाही, तर त्यांनाही सोडणार नाही.”

पुढील तपास सुरू दरम्यान, या प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने शाळांमधील नोंदींची तपासणी सुरू आहे.

मात्र, या तपासणीबाबतही शंका व्यक्त करत जिल्हाधिकाऱ्यांनी योग्य तपास करावा, अन्यथा त्यांनाही उत्तर द्यावे लागेल, असा इशारा सोमय्या यांनी दिला आहे.

या प्रकरणात आता काय कारवाई होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. अकोला पोलिसांनी सोमय्या यांच्या तक्रारीनुसार कठोर पावले उचलण्याचे मान्य केले आहे.

 

अधिक बातम्या करीता भेट द्या : https://ajinkyabharat.com/patur-yethil-ayurveda-rugnalaya-comes-arogya-yojnechya-charate/

Related News