आलेगावातील बस निवारा बनला जीवघेणा संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष
आलेगाव दि.४
प्रतिनिधी येथील प्रवाशी निवाऱ्याची दयनीय अवस्था झाली असून सदर निवारा केंव्हाही प्रवाशांच्या अंगावर पडून
Related News
अवकाळी पावसाचा वणीसह परिसराला तडाखा;
दहीगाव प्रकरणाचा निषेध; तेल्हारा शहर बंद, बाजारपेठा ठप्प
अलीगढमधील हॉटेलमध्ये देवतांच्या चित्रांसह नॅपकिन दिल्याने गोंधळ;
पाच वर्षांनंतर कैलास-मानसरोवर यात्रेला पुन्हा सुरूवात;
चंदननगरमध्ये तरुणाचा निर्घृण खून
पातूर शहरात ‘रान कसायांची’ टोळी सक्रिय
अकोल्यात गुड फ्रायडे भाविकतेने साजरा;
एका महिन्याच्या चिमुरडीची निर्घृणपणे हत्या….
काही सेकंदांची चूक आणि आयुष्य संपलं…
जय श्री राम ग्रुप द्वारा गौसेवा कार्य
ईस्टर संडेच्या तयारीने धार्मिक वातावरण भारावले
बीअरच्या बाटलीने ३६ वार:
मोठी दुर्घटना होण्याची शक्यता बळावली आहे.तरी संबंधित अधिकाऱ्यांनी वेळीच दखल घेऊन पुरातन प्रवाशी निवारा बांधण्याची गरज आहे.
पातूर तालुक्यातील आलेगाव येथील प्रवाशांना बसच्या प्रतिक्षे करीता पूर्वी काळी बांधलेल्या प्रवासी निवाऱ्याची
गेल्या काही वर्षापासून दयनीय अवस्था झाली असून निवाऱ्यावरील सिमेंटचे पत्रे तुटलेले असून पत्र्याखालील लाकडी जोडणी तुटलेली आहे.
त्यामुळे,सदर प्रवाशी निवारा हा केंव्हाही प्रवाशांच्या अंगावर कोसळून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता बळावली आहे.
दि ३ फेब्रुवारी रोजी अनेक महिला प्रवाशी बसच्या प्रतीक्षेत बसलेल्या असताना,माकडांच्या झुंडीने सदर प्रवाशी निवाऱ्यावर तांडव घातला
असता प्रवासी निवार्यावरील टिन पत्रे जोरात हलले त्यामुळे,सदर निवारा अंगावर पडेल या भीतीने सर्व महिला प्रवाशांनी तेथून पळ काढून बाहेर थांबल्या.
या गंभीर बाबी कडे संबंधित प्रशासनाने वेळीच दखल घेऊन दयनीय प्रवाशी निवार्याचे तात्काळ बांधकाम करावे.
तसेच सद्या उन्हाळ्याची चाहूल सुरू झाली असून प्रवाशांना सावलीची आणि बसण्याची सोय असणे गरजेचे आहे.
दयनीय अवस्थेत असलेल्या प्रवाशी निवार्या बाबत आगर क्रमांक १ चे आगर प्रमुख बुंदे यांचे सोबत भ्रमध्वनी द्वारे संपर्क केला
असता सदर प्रवाशी नीवाऱ्या बाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्रव्यवहारा द्वारे कळवणार असल्याचे आगार प्रमुख बुंदे यांनी सांगितले.
Visit for more news: https://ajinkyabharat.com/mundgaon-grampanchayaticha-ghankchara-administration-scam-ughd-24-lakhs-bills/