अकोला: राज्य सरकारच्या १५ टक्के एसटी भाडेवाढीच्या निर्णयाविरोधात राज्यभर संतप्त
प्रतिक्रिया उमटत आहेत. या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे गटाची शिवसेना
आक्रमक झाली असून, अकोला शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाच्या
Related News
चेहऱ्याचा रंग उजळण्यासाठी सोपे घरगुती उपाय….
कांगो नदीत भीषण बोट दुर्घटना;
फ्लोरिडा विमानतळावर थरारक क्षण;
झारखंडच्या रांचीमध्ये पहिल्यांदाच एअर शो;
दिल्लीतील मुस्तफाबादमध्ये इमारत कोसळली;
पुन्हा ‘ठाकरे विराजमान’? राज ठाकरे यांचा युती प्रस्ताव, उद्धव ठाकरे यांचा सकारात्मक प्रतिसाद!
तापमान वाढीमुळे पोल्ट्री व्यवसायाला फटका;
माकडांच्या टोळक्यांमध्ये भीषण झटापट; रस्त्यावरच दिसला ‘गँगवॉर’सारखा थरार
पत्नीच्या मारहाणीची तक्रार करताच नवऱ्यावरच 307 कलमांतर्गत गुन्हा
पत्नीने आइब्रो सेट केल्याच्या रागातून पतीने केली चोटी कापण्याची धक्कादायक घटना
हरिद्वार-देहरादून महामार्गावर महिलेचा गोंधळ,…
अकोल्यात गुडफ्रायडे भक्तीभावाने साजरा
गेटवर चक्काजाम आंदोलन करण्यात आले.
एसटी भाडेवाढीमुळे प्रवाशांवर अतिरिक्त आर्थिक बोजा टाकला जात असल्याचा
आरोप आंदोलकांनी केला. “लालपरीचे भाडे वाढल्यामुळे सामान्य नागरिकांचे हाल होत आहेत.
हा निर्णय तातडीने मागे घेतला जावा,” अशी मागणी आंदोलकांनी केली.
आंदोलकांनी संताप व्यक्त करत एसटी बसच्या चाकांची हवा सोडली.
तसेच परिवहन मंत्री आणि राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.
उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाडेवाढीच्या निर्णयाला “सामान्य जनतेवर अन्यायकारक” ठरवले.
“आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या नागरिकांसाठी एसटी सेवा ही जीवनवाहिनी आहे,
आणि या सेवेच्या भाड्यात वाढ करून सरकारने सामान्य लोकांच्या समस्या वाढवल्या आहेत,” असा आरोप आंदोलकांनी केला.
भाडेवाढीचा निर्णय तातडीने मागे घेऊन प्रवाशांना दिलासा द्यावा, अन्यथा राज्यभर
आंदोलन उभे करण्यात येईल, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
राज्य सरकारने या मागण्यांची गंभीर दखल घेत भाडेवाढीच्या निर्णयाचा फेरविचार करावा,
अशी अपेक्षा सामान्य जनतेकडून व्यक्त होत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/rudhi-tradition-phata-deet-vadilanchaya-bone-and-ash-sheetat-buried/