एसटी भाडेवाढीविरोधात ठाकरेंची सेना आक्रमक; आज राज्यभरात आंदोलन

एसटी भाडेवाढीविरोधात ठाकरेंची सेना आक्रमक; आज राज्यभरात आंदोलन

एसटी महामंडळाच्या बसच्या तिकीट दरात १४.९५ टक्क्यांनी नुकतीच वाढ करण्यात आली.

राज्य परिवहन प्राधिकरणाचे सदस्य, अतिरिक्त पोलीस वाहतूक महासंचालक

आणि परिवहन आयुक्त यांच्यासह प्राधिकरणाच्या अध्यक्षतेखालील समितीने भाडेवाढीला मंजूरी दिली.

Related News

मात्र या भाडेवाढीनंतर प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली.

अशातच आता एसटी दरवाढीमुळे प्रवाशांसोबत विरोधक संतप्त झाले आहे.

एसटीच्या भाडेवाढीविरोधात उद्धव ठाकरे यांची शिवसेना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

याच भाडेवाढीचा निषेध करत ठाकरे गट आज राज्यभर आंदोलन करणार आहे.

काल एसटी भाडेवाढीविरोधात ठाकरे गटाने छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलन केलं होतं.

तर आज राज्यभरातील विविध जिल्ह्यात ठाकरे गटाने चक्काजमा आंदोलनाचा इशारा देत

रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळतंय. राज्यातील विविध डेपो बाहेर ठाकरे गटाचे नेते आक्रमक होताना दिसले.

यावेळी त्यांनी एसटीची भाडेवाढ त्वरीत मागे घ्या… अशी घोषणाबाजी करत आपली मागणी लावून धरली.

राज्यातील बीड, अमरावती, सोलापूर, ठाणे, कल्याण, कोल्हापूर, बुलढाणा

यासह विविध भागात ठाकरे गटाचं चक्काजाम आंदोलन सुरू कऱण्यात आलंय.

सोलापूर – ठाकरे गटाकडून ST तिकीट दरवाढी विरोधात निदर्शने सुरु

इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/akolyatiyal-kamagaranasathi-health-atm-mashinchi-facility/

Related News