हाॅटेलला लागलेल्या 10 जणांचा होरपळून मृत्यू, 32 जखमी; जीवाच्या आकांताने अनेकांनी 11व्या मजल्यावरून उड्या मारल्या

हाॅटेलला लागलेल्या 10 जणांचा होरपळून मृत्यू, 32 जखमी; जीवाच्या आकांताने अनेकांनी 11व्या मजल्यावरून उड्या मारल्या

भीषण आगीने 11 मजली इमारतीला वेढले. अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन

दलाचे जवान आणि बचाव कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले.

उत्तर-पश्चिम तुर्कीतील बोलू राज्यातील एका स्की रिसॉर्टमधील हॉटेलला लागलेल्या आगीत

Related News

10 जणांचा मृत्यू झाला. 32 जण जखमी झाले आहेत. वृत्तसंस्था रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार,

बोलूच्या कार्तलकाया रिसॉर्टमध्ये आग लागल्याने चेंगराचेंगरी झाली.

घाबरल्यामुळे दोघांनी इमारतीवरून उडी मारल्याने त्यांचा मृत्यू झाला.

बोलूचे गव्हर्नर अब्दुलअजीज आयदिन यांनी सांगितले की, या हॉटेलमध्ये 234 पाहुणे थांबले होते.

आगीमुळे चेंगराचेंगरी झाली. काही जणांनी घाईघाईने खिडकीतून पत्र्यामधून खाली उतरण्याचा प्रयत्न केला.

आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. राज्यपाल कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार,

अग्निशमन दलाच्या 30 गाड्या आणि 28 रुग्णवाहिका घटनास्थळी पाठवण्यात आल्या.

आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अधिकाऱ्यांनी 267 आपत्कालीन कर्मचारीही तैनात केले.

रिपोर्टनुसार, तुर्कीचे पर्यटन आणि आरोग्य मंत्री अपघातस्थळी भेट दिली.

कार्तलकाया हे इस्तंबूलच्या पूर्वेला सुमारे 300 किलोमीटर अंतरावर कोरोग्लू पर्वतांमध्ये स्थित एक लोकप्रिय स्की रिसॉर्ट आहे.

सध्या तुर्कीमध्ये शाळांना सेमिस्टरच्या सुट्ट्या सुरू आहेत. त्यामुळे येथील सर्व हॉटेल्समध्ये मोठी गर्दी असते.

खबरदारी म्हणून या भागातील इतर हॉटेल्स रिकामी करण्यात आली आहेत.

इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/in-chhatrapati-sambhajinagar-thackeray-gatala-khindar/

Related News