छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाला खिंडार, अतुल सावेंची खेळी, भाजपची ताकद वाढणार

छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाला खिंडार, अतुल सावेंची खेळी, भाजपची ताकद वाढणार

विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या

निवडणुकांसाठी भाजप कामाला लागलाय. एकीकडे पक्षाची सदस्य संख्या

एक कोटी 50 लाख सदस्य संख्या करण्याचे भाजपचे लक्ष्य असल्याचं भाजप मंत्री सांगत आहेत.

Related News

दुसरीकडे विधानसभेत पराभव झाल्यानंतर ठाकरे गटाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसह

महापालिका निवडणूक ही स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा  केली आहे.

दरम्यान, मनपा निवडणुकांसाठी स्थानिक पातळीवर मोर्चेबांधणी सुरु असतानाच छत्रपती संभाजीनगर

जिल्ह्यात ठाकरे गटाला खिंडार पडलं गेलंय. ठाकरे गटाचे माजी शहर प्रमुख विश्वनाथ स्वामी भाजपात प्रवेश करणार आहेत.

मंत्री अतुल सावेंच्या  नेतृत्वाखाली व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे.

दरम्यान येत्या 23 जानेवारीला शिवसेना मेळाव्यात मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचा दावा

शिवसेनेचे नेते माजी खासदार राहुल शेवाळे यांनी केला आहे.

ठाकरे गटाचे 15 आमदार तर काँग्रेसचे दहा आमदार शिंदे सेनेच्या संपर्कात असल्याचा दावाही त्यांनी केला.

त्यादरम्यानच मंत्री अतुल सावेंकडून ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय.

विधानसभेत पराभव झाल्यानंतर पुन्हा महायुतीत येण्यासाठी महाविकास आघाडीतील

नेत्यांसह कार्यकर्त्यांना पक्षात खेचण्याचे प्रयत्न होत असल्याची चर्चा आहे.

छत्रपती संभाजीनगरात ठाकरे गटाला धक्का

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शिवसेना उद्धव ठाकरे गटाला खिंडार पडलं आहे.

मंत्री अतुल सावे यांच्याकडून ठाकरे गटाचे माजी शहर प्रमुख विश्वनाथ स्वामी यांना भाजपमध्ये प्रवेश दिला जाणार आहे.

मंत्री अतुल सावे यांच्या नेतृत्वाखाली भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार असल्याचं सांगण्यात आलंय.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मोर्चेबांधणीला सुरुवात

राज्यात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकानंतर  आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या,

महापालिका निवडणुकांच्या तयारीला सर्वच पक्ष सज्ज झाले आहेत.

स्थानिक पातळीवर पक्षांकडून मोर्चे बांधणी सुरू असून शिवसेना ठाकरे गट महापालिका आणि स्थानिक

स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर आता छत्रपती संभाजीनगर शहरात ठाकरे गटाचा माजी शहर

प्रमुख विश्वनाथ स्वामी भाजपमध्ये प्रवेश आहेत. दुसरीकडे स्वबळावर मनपा निवडणुका लढणार असल्याच्या निर्णयावर

महाविकास आघाडीचा नेत्यांनीही संमिश्र प्रतिक्रिया दिल्यात.

संजय राऊत यांनी दिलेल्या स्वबळाच्या नाऱ्यावर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या आमदारांनी काहीशी

नाराजीचीच भूमिका घेतली आहे.   तर दुसरीकडे ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये स्वबळावर निवडणुका लढण्याचा घोषणेला पाठिंबा आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/major-update-on-parner-sugar-factory-sale-issue-demand-for-sit-inquiry-from-farmers/

Related News