मकरसंक्रांती सण म्हटला की, महिलावर्गात वाणवाटपाच्या परंपरेने प्रेम

मकरसंक्रांती सण म्हटला की, महिलावर्गात वाणवाटपाच्या परंपरेने प्रेम

मकरसंक्रांती सण म्हटला की, महिलावर्गात वाणवाटपाच्या परंपरेने प्रेम, आपुलकी आणि आदर व्यक्त केला जातो.

मात्र, अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील बहादूरा गावात माळी कुटुंबाने अनोखी परंपरा जोपासली आहे.

गेल्या शंभर वर्षांपासून माळी परिवार मकरसंक्रांतीच्या दिवशी गावातील मुलांना ऊस वाटण्याची परंपरा कायम ठेवत आहे.

Related News

ही परंपरा सितारामजी माळी-पाटील यांनी त्यांच्या मुलगा जगदेव यांच्या जन्माच्या आनंदात सुरू केली होती. त्यानंतर पिढ्यानपिढ्या

या परंपरेचे पालन करण्यात आले आहे. सध्या विठ्ठल माळी या परंपरेचे पालन करत असून, गावातील मुलांमध्ये आनंदाचा उत्सव साजरा केला जातो.

गावकरी या अनोख्या परंपरेचे कौतुक करतात आणि यामुळे गावात उत्साहाचे वातावरण निर्माण होते.

माळी परिवाराने सुरू केलेली ही परंपरा मकरसंक्रांतीच्या सणाला एक विशेष ओळख देत आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/major-accident-due-to-chinese-manja-in-akola-city-on-the-day-of-kaal-makar-sankranti/

Related News