तांदुळवाडी फाट्यानजिक मोटरसायकल स्वारास अज्ञात आयशर वाहनाने ओव्हरटेक करताना
उडविले मोटरसायकल स्वार गंभीर !अकोट शहर प्रतिनिधी. राजकुमार वानखडे.
अकोट अकोला मार्गावरील तांदुळवाडी फाट्यानजिक असलेल्या बरेठीया यांच्या
वाडी जवळ अज्ञात आशयर ट्रक ने ओव्हरटेक करत
Related News
चंद्रपूरमध्ये वाघाची दहशत – ७२ तासांत ५ महिलांचा मृत्यू
“पहलगामपर्यंत पापाचा घडा भरला होता…
नीट ची तयारी करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांची आत्महत्या
बुद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं अकोल्यातील अशोक वाटिकेत प्रार्थनांचं आयोजन
बुद्ध पौर्णिमा निमित्त महाबोधी वृक्षाचे १२ तास महापूजा
मराठा पर्यटन ट्रेन ९ जूनपासून सुरू
विराट कोहलीची टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती;
ड्रोन हल्ल्यांमुळे PSL स्थगित; बांगलादेशी खेळाडूचा पाकिस्तान क्रिकेटवर गंभीर आरोप
भारताच्या कारवाईत पाकिस्तानच्या फायटर जेटला नुकसान
काटेपूर्णा अभयारण्यात आज वैशाख पौर्णिमेला मचाणावरून होणार प्राणी गणना
अकोट तालुक्यातही वादळी वाऱ्यासह पावसामुळे मोठे नुकसान
लोहारा पोलिसांच्या कारवाईत दोन पिस्तुलांसह दोन हिस्ट्रीशीटर अटकेत
असताना अकोल्याहून अकोट कडे जाणाऱ्या मोटरसायकल स्वारास उडविले यामध्ये मोटरसायकल स्वार गंभीर जखमी झाला आहे.
याबाबत वृत्त असे की अकोट येथील सुप्रसिध्द डॉ.मनोज गावंडे यांचे बंधू नरेंद्र रामभाऊ गावंडे वय ४७ वर्ष
रा.अकोला हे अकोल्यावरून अकोट येथे सकाळी १० वाजता दवाखान्यात येत असताना अकोट वरून
अकोल्याकडे जाणाऱ्या अज्ञात आयशर ने तांदुळवाडी फाट्या नजिक असलेल्या बरेठीया यांच्या वाडी जवळ ओव्हरटेक करताना
जोरदार धडक दिली यामध्ये मोटर सायकल स्वार नरेंद्र गावंडे यांच्या उजव्या पायाला व उजव्या हाताला तसेच तोंडाला गंभीर
स्वरुपाची दुखापत झाली.व डोक्यातील हेल्मेट सुद्धा फुटले आहे व मोटरसायकल चे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
या वेळी आयशर चालक आपली गाडी घेऊन फरार होण्यास यशस्वी झाला. सदर जखमींला वणी वारुळा येथील ग्रामसेवक
अमेश खारोडे, आशिष रायबोले, पत्रकार राजकुमार वानखडे सह असंख्य नागरीकांनी रुग्णवाहिकेला फोन केला
तसेच जखमीचे भाऊ डॉ.गावंडे यांना सुद्धा फोन करून घटनास्थळी बोलावले त्याचप्रमाणे याबाबत बीट जमादार खंडारे व
अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर जुनगरे यांना सुद्धा माहिती देण्यात आली. माहितीच्या आधारे बीट जमादार
खंडारे यांनी घटनास्थळ पंचनामा केला व लोकांच्या सांगण्याप्रमाणे कॅरेट भरलेला आयशर ट्रक साठी उरळ पोलीस स्टेशन,
अकोला पोलीस स्टेशन, तेल्हारा पोलीस स्टेशन येथे फोन लावून घटनेची माहिती दिली.असता जखमीला
डॉ .मनोज गावंडे यांच्या म्हणण्यानुसार अकोला येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पुढील तपास मुंडगाव बिट जमादार खंडारे, तोमर व त्याचे सहकारी करीत आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/type-of-mobile-theft-in-the-bar-of-akolyati-chohatta-market/