अकोला मेडिकल कॉलेज व अकोला मेन, हॉस्पिटल रुग्णालय येथे अकोला वाशिम बुलढाणा अमरावती हिंगोली
या जिल्ह्यातील रुग्णांची संख्या व जनतेचा विश्वास यामुळे रुग्णांना चांगल्या सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी माजी केंद्रीय
मंत्री नामदार संजय भाऊ धोत्रे यांनी पाठपुरावा करून तसेच त्या पाठपुराव्याला केंद्र आणि राज्य शासनाकडे पाठपुरावा
भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व मेन हॉस्पिटल अकोला मेडिकल कॉलेज अभ्यासगत समितीचे अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर,
यांनी आपले सहकारी खासदार अनुप धोत्रे यांच्यासोबत पाठपुरावा करून शंभर कोटी रुपये केंद्र सरकारकडून
मंजूर करून आणून मेडिकल कॉलेज व रुग्णांसाठी वेगवेगळ्या सोयी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने नवीन वार्ड, अत्याधुनिक
सुविधा व भव्य दिव्य इमारत रुग्णांसाठी वेगवेगळ्या व्यवस्था करण्याच्या दृष्टीने आराखडा करण्याच्या दिशेने व कामाला सुरुवात करण्याच्या
दिशेने आमदार रणधीर सावरकर यांनी अकोला मेडिकल कॉलेजला भेट दिली यावेळी सार्वजनिक बांधकाम अभियंता कार्यकारी अभियंता प्रसाद पाटील,
राजेश राठोड, कुलकर्णी, तसेच वेगवेगळे मेडिकल कॉलेजचे अधिकारी, नियोजन विभाग सार्वजनिक बांधकाम अधिकारी
सोबत अकोला मेडिकल कॉलेजची प्रमुख श्रीमती मीनाक्षी गजभिये, भाजपा उद्योजक आघाडीचे उन्मेश मालू, भाजपा कोषाध्यक्ष वसंत बाछुका,
अभियंता आघाडीची योगेश मानकर, डॉक्टर किशोर मालोकार, डॉक्टर अभय जैन, जयंत मसने किशोर पाटील,
डॉक्टर शंकरराव वाकोडे विजय अग्रवाल, एडवोकेट देवाशिष काकड, अक्षय जोशी ,माधव मानकर, गिरीश जोशी,
संतोष पांडे, गणेश अंधारे, सागर शेगोकार, अंबादास उमाळे डॉक्टर अमित कावरे, मोहन पारधी शिवा शर्माआधी समवेत होते.