बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील काही गावांमध्ये अचानक केसगळतीचे प्रमाण वाढले आहे. ग्रामस्थांच्या केस आणि दाढीचे केस वेगाने गळत आहेत,
त्यामुळे भीतीचे वातावरण आहे. प्राथमिक तपासणीत दूषित पाण्यात नायट्रेटचा उच्च प्रमाण आढळला आहे, जो केसगळतीचे एक कारण असू शकतो.
देशात एचएमपीव्ही या व्हायरसने दस्तक देऊन नागरिकांमध्ये दहशत माजवलेली असतानाच बुलढाण्यात वेगळ्याच
Related News
12 ऑगस्टला येणार नवी Bajaj Pulsar; डिजिटल फीचर्स, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि दमदार लूकसह होणार एंट्री
भारतीय दुचाकी बाजारपेठेत बजाज पल्सरचे नाव आजही तरुणा...
Continue reading
वैभव सूर्यवंशीची लॉटरी! दुलीप ट्रॉफीत उपकर्णधारपदाची संधी; आता कर्णधारपदासाठी मोठी तयारी?
दुलीप ट्रॉफीसाठी वैभव सूर्यवंशीवर निवड समितीचा मोठा विश्वास, भविष्यात नेतृत्वाची जबाबदारी...
Continue reading
CWG 2026 : “मी मैदानावर नसलो तरी भारताकडे दमदार भालाफेकपटू आहेत”; रौप्य पदकानंतर नीरज चोप्राचं मोठं विधान
कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये रौप्य जिंकल्यानंतर नीरज चोप्राचा आत्मविश्वास; ...
Continue reading
शिवसेनेचं चिन्ह आपल्यालाच मिळणार, नाही मिळालं तर ते गोठवलं जाईल; उद्धव ठाकरेंचा कार्यकर्त्यांमध्ये विश्वास
शिवसेना भवनातील बैठकीत उद्धव ठाकरेंचे मोठे संकेत; चिन्हावरील न्यायालयीन ...
Continue reading
आजाराने डोकं वर काढल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. बुलढाण्यातील शेगावमधील ग्रामस्थ अचानक टकले होत आहेत.
त्यांचे डोक्याचे आणि दाढीचे केस अचानक गळू लागले आहेत. त्यामुळे गावात जो तो टकला दिसत आहे. पुरुषच नाही तर महिलांमध्येही ही समस्या दिसत आहे.
त्यामुळे या गावातील नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. हा काय प्रकार आहे? ही भानामती आहे की वेगळाच काही व्हायरस आहे, अशी चर्चा गावात सुरू आहे.
या प्रकाराची सरकारने गंभीर दखल घेतली असून या सर्व प्रकारामागचं कारणही समोर आलं आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील केस गळती प्रकरणात आता मोठी अपडेट हाती आली आहे. शेगाव तालुक्यातील बोंडगावातील आणि खातखेड
येथील पाण्यात नायट्रेट सारखा अत्यंत विषारी घटक मोठ्या प्रमाणात आढळून आला आहे.
तर पाण्याची टीडीएस लेव्हलही भयंकर वाढली असल्याचं या पाण्याच्या तपासणीत उघड झालं आहे.
त्यामुळेच गावकऱ्यांसाठी हे पाणी वापरणं विष ठरत आहे. परिणामी गावातील लोकांच्या केस गळतीचं प्रमाण वाढलं असल्याचं सूत्रांनी सांगितलं.