वाडेगाव नाफेड खरेदी केंद्रावर चुकीचे धोरण अवलंबले जात असल्याचा आरोप करण्यात येऊन शेतकरी ब्रिगेड आणि समस्त शेतकरी वर्गाने
6 जानेवारी 2025 रोजी दुपारी अडीच वाजता वाडेगाव पातुर रोडवरील जिल्हा परिषद शाळेजवळ रास्ता रोको आंदोलन केले. शेतकऱ्यांनी नाफेड कडील नोंदणी संपत
असल्यामुळे शासनाने नोंदणीसाठी मुदत वाढ देण्याची मागणी केली. तसेच, नाफेड खरेदी केंद्रावर सोयाबीनच्या मोजमापामध्ये होणाऱ्या विलंबामुळे
Related News
चेहऱ्याचा रंग उजळण्यासाठी सोपे घरगुती उपाय….
कांगो नदीत भीषण बोट दुर्घटना;
फ्लोरिडा विमानतळावर थरारक क्षण;
झारखंडच्या रांचीमध्ये पहिल्यांदाच एअर शो;
दिल्लीतील मुस्तफाबादमध्ये इमारत कोसळली;
पुन्हा ‘ठाकरे विराजमान’? राज ठाकरे यांचा युती प्रस्ताव, उद्धव ठाकरे यांचा सकारात्मक प्रतिसाद!
तापमान वाढीमुळे पोल्ट्री व्यवसायाला फटका;
माकडांच्या टोळक्यांमध्ये भीषण झटापट; रस्त्यावरच दिसला ‘गँगवॉर’सारखा थरार
पत्नीच्या मारहाणीची तक्रार करताच नवऱ्यावरच 307 कलमांतर्गत गुन्हा
पत्नीने आइब्रो सेट केल्याच्या रागातून पतीने केली चोटी कापण्याची धक्कादायक घटना
हरिद्वार-देहरादून महामार्गावर महिलेचा गोंधळ,…
अकोल्यात गुडफ्रायडे भक्तीभावाने साजरा
शेतकऱ्यांना अतिरिक्त पैसे देण्याचीही मागणी केली.
शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांनी आंदोलनात १२ जानेवारी पर्यंत शेतकऱ्यांना मोफत बारदाना देण्याची आणि
नाफेडच्या ठिकाणी मोजमापास वेळ लागत असल्यामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त पैसे देण्याची मागणी केली. अन्यथा,
विदर्भात तीव्र आंदोलन होईल असा इशारा दिला. आंदोलनाच्या दरम्यान शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर बसून रस्ता रोको केला,
ज्यामुळे मार्गाच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या.
या आंदोलनात शिवाजी म्हैसने, प्रा. नितीन मानकर, मोहन सरप, शंकर सरप, विलास मानकर, शैलेश भटकर, प्रभाकर उजाडे, शेख शिकंदर,
गणेश कोगडे, पंढरी जावरकार, संतोष सरप, शरद घाटोळ, रामदास सरप, गजानन लांडे, रा. शंकर सोनटक्के, माणिकराव म्हैसने, रामदास काळे,
नितीन म्हैसने, डॉ. अशोक मेतकर, गजानन कातखेडे यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.
आंदोलन संपल्यानंतर स्थानिक पोलीस चौकीचे कर्मचारी यांनी वाहतूक सुरळीत केली.
इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/shree-narayan-multipurpose-institution-constituent-vigilant-undertaking/