Sonam Kapoor On Aishwarya Rai : ‘ती दुसऱ्या जनरेशनची आंटी’, ऐश्वर्या रायबद्दल बेताल वक्तव्य; चाहत्यांच्या संतापानंतर सोनम कपूरची सारवासारव
बॉलिवूडमध्ये अनेक वाद झाले आहेत, मात्र काही वाद वर्षानुवर्षे चर्चेत राहतात. अभिनेत्री सोनम कपूर आणि माजी विश्वसुंदरी ऐश्वर्या राय बच्चन यांच्यातील ‘आंटी’ वाद हा त्यापैकीच एक मानला जातो. 2009 मध्ये एका मुलाखतीदरम्यान सोनम कपूरने केलेल्या एका वक्तव्याने सोशल मीडियापासून मनोरंजन विश्वापर्यंत मोठी खळबळ उडाली होती. त्या वेळी नुकतीच इंडस्ट्रीत पाऊल ठेवलेल्या सोनम कपूरने ऐश्वर्या रायचा उल्लेख “दुसऱ्या जनरेशनची आंटी” असा केल्याची चर्चा रंगली आणि तिच्यावर टीकेची झोड उठली.
आजही हा किस्सा बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चिलेल्या वादांमध्ये गणला जातो. विशेष म्हणजे या संपूर्ण वादात ऐश्वर्या रायने कोणतीही सार्वजनिक प्रतिक्रिया न देता शांतता राखली होती, तर वाढत्या टीकेनंतर सोनम कपूरला आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण द्यावे लागले.
Related News
Sonam Kapoor : कसा सुरू झाला वाद?
2009 मध्ये एका आंतरराष्ट्रीय सौंदर्य प्रसाधन कंपनीने सोनम कपूरला आपल्या ब्रँडचा नवा चेहरा म्हणून निवडले. त्याआधी अनेक वर्षांपासून ऐश्वर्या राय त्या ब्रँडची प्रमुख ब्रँड ॲम्बेसेडर होती. त्यामुळे माध्यमांमध्ये “नवीन पिढी विरुद्ध जुनी पिढी” अशी चर्चा सुरू झाली.
याच पार्श्वभूमीवर पत्रकारांनी Sonam Kapoor ला ऐश्वर्या रायबद्दल प्रश्न विचारला. त्यावेळी तिने कथितरित्या “ती दुसऱ्या जनरेशनची आंटी आहे” असे विधान केल्याचे वृत्त समोर आले. हे वक्तव्य समोर येताच सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.
फक्त 11 वर्षांचे अंतर, तरीही ‘आंटी’?
त्या काळात ऐश्वर्या राय सुमारे 36 वर्षांची होती, तर Sonam Kapoor चे वय 25 वर्षे होते. दोघींमध्ये अवघे 11 वर्षांचे अंतर असतानाही ‘आंटी’ असा उल्लेख केल्यामुळे अनेक चाहत्यांनी सोनम कपूरवर टीका केली.नेटिझन्सच्या मते, वयाचा एवढा मोठा फरक नसताना अशा प्रकारची टिप्पणी करणे हे असभ्य आणि अनावश्यक होते. अनेकांनी सोशल मीडियावर सोनमच्या वक्तव्याला उद्धटपणाचे उदाहरण म्हटले.
Sonam Kapoor ने दिलेले स्पष्टीकरण
वाद वाढल्यानंतर Sonam Kapoor ने एका मुलाखतीत आपली भूमिका स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. ती म्हणाली,”ऐश्वर्या रायने माझे वडील अनिल कपूर यांच्यासोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यामुळे त्या माझ्या आधीच्या पिढीतील आहेत. त्या अर्थाने मी त्यांना ‘आंटी’ म्हटले.”मात्र हे स्पष्टीकरण लोकांना फारसे पटले नाही. उलट या वक्तव्यामुळे तिच्यावर आणखी टीका झाली.
चाहत्यांनी उपस्थित केले अनेक प्रश्न
सोशल मीडियावर अनेकांनी सोनम कपूरलाच आरशात पाहण्याचा सल्ला दिला. काही चाहत्यांनी निदर्शनास आणून दिले की, सोनमने स्वतः तिच्यापेक्षा वयाने खूप मोठ्या असलेल्या सलमान खानसारख्या अभिनेत्यांसोबत काम केले आहे.जर केवळ एका पिढीतील कलाकारांसोबत काम केल्यामुळे कोणाला ‘आंटी’ म्हणायचे असेल, तर हा निकष इतरांनाही लागू व्हायला हवा, अशी टीका करण्यात आली.
ऐश्वर्या रायची शांत भूमिका
या संपूर्ण प्रकरणात सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे ऐश्वर्या रायची भूमिका.वाद वाढत असतानाही ऐश्वर्याने कोणत्याही मुलाखतीत किंवा सोशल मीडियावर सोनम कपूरच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली नाही. तिने मौन बाळगणे पसंत केले.अनेकांनी तिच्या संयमाचे कौतुक केले आणि अनावश्यक वादात न पडण्याचा तिचा निर्णय परिपक्व असल्याचे म्हटले.
नंतर बदलली भूमिका
वाद अधिक वाढल्यानंतर Sonam Kapoor ने पुन्हा एकदा स्पष्टीकरण दिले. तिने म्हटले,”माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ लावला गेला. मी ऐश्वर्या रायबद्दल खूप आदर बाळगते. मी तिला कधीही ‘आंटी’ म्हणणार नाही.”या वक्तव्यानंतर वाद काहीसा शांत झाला.
Cannes मध्ये ऐश्वर्याला दिला पाठिंबा
2016 मध्ये कान चित्रपट महोत्सवात ऐश्वर्या रायने जांभळ्या रंगाची लिपस्टिक लावल्यामुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोलिंग झाले होते.त्यावेळी सोनम कपूरने मात्र ऐश्वर्याच्या समर्थनार्थ भूमिका घेतली. तिने स्पष्टपणे सांगितले की, फॅशन म्हणजे नवीन प्रयोग करण्याचे व्यासपीठ असून ऐश्वर्याचा तो लूक अत्यंत प्रभावी आणि सुंदर होता.या घटनेनंतर दोघींमधील मतभेद संपल्याची चर्चा रंगली.
