कृषी क्रांतीचे प्रणेते स्व. भाऊसाहेब उर्फ पंजाबराव देशमुख यांच्या 126 व्या जयंती दिनानिमित्त
अकोल्यातील कृषी विद्यापीठाच्या क्रिडांगणावर..
डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, कृषी विभाग, महाराष्ट्र शासन तथा
कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), अकोला यांचे संयुक्त विद्यमाने 27 ते 29 डिसेंबर
या कालावधीत राज्यस्तरीय भव्य कृषी प्रदर्शनी, कृषी महोत्सव व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहेय…
या प्रदर्शनीमध्ये फळबाग,भाजीपाला,
फुलशेती व वनौषधी, कापूस, ज्वारी, गहू, कडधान्य, तेलबिया, पाणलोट विकास, पशु संवर्धन
व दुग्ध व्यवसाय, कृषी अभियांत्रिकी व अवजारे इत्यादी
विभागां सोबतच राज्याचे कृषी विभाग इतर कृषी विद्यापीठे, सलग्न कृषी संस्था व शासनाच्या इतर विभागांची दालने राहणार आहेत..
शेतकरी बंधूंचे ग्रामीण विकासा संबंधी कृषी संलग्नित व्यवसाय व शेतीपूरक
जोडधंदे तसेच कृषीमालाच्या प्रक्रिया उद्योगा विषयीची दालने कृषी प्रदर्शनीचे मुख्य आकर्षण ठरणार आहेय..
असुन कृषी प्रदर्शनाला भेट देणाऱ्या शेतकऱ्यांकरिता प्रेरणादायी ठरणार आहे.
याशिवाय गट शेती, स्वयंसहायता बचत गटांच्या यशोगाथा, महिला बचत गटांनी उत्पादित केलेले कृषी उत्पादने,
तकऱ्यांनी तयार केलेले नाविन्यपूर्ण कृषि निविष्ठा इत्यादींची अभिनव दालने प्रदर्शनीचे आकर्षण केंद्र ठरणार आहेय..
या प्रदर्शनीमध्ये 400 हून अधिक दालने राहणार असून
ही कृषी प्रदर्शनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदपर्वणी ठरणार आहेय…
इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/fire-incident-occurred-due-to-shock-circuit-in-government-rest-house-at-dhaba/