शहरात नाताळ सण मोठ्या उत्साहात संपन्न…

अकोला

अकोला :- २५ डिसेंबर रोजी जगभरात ख्रिसमस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

या दिवशी चर्च मध्ये जाऊन प्रार्थना करून मित्र- मंडळींना केक भरवून शुभेच्छा दिल्या जातात.

मूर्तिजापूर शहरात देखील विविध चर्च मध्ये आज मोठ्या उत्साहात ख्रिसमस हा सण उत्सहात साजरा केला जात आहे.

Related News

मध्यरात्री पासून चर्च मध्ये विविध कार्यक्रम झाल्यावर आज सकाळपासून चर्चमध्ये विविध संस्कृती

तसेच प्रार्थना चे कार्यक्रम आयोजित करण्यात आलं होते.

पहिलं मराठी ख्रिस्ती मंडळी असणारा मूर्तिजापूरातील आलायन्स चर्च मध्ये देखील

मोठ्या उत्साहाने ख्रिसमस साजरा करण्यात आलं आहे.

येशू ख्रिस्त यांचा जन्मदिवस म्हणून ख्रिसमस हा सण २५ डिसेंबर रोजी दर वर्षी सर्वत्र साजरा केला जातो.

दिवसभर विविध प्रार्थना च्या कार्यक्रमा चे आयोजन शहरातील विविध

चर्च मध्ये आयोजित करून एकमेकांना शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी अनेक सामाजिक संस्था तसेच राजकीय पक्षांच्या माध्यमातून देखील नागरिकांना शुभेच्छा देण्यात आल्या.

इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/midistoon-truck-palavila-crime-filed/

Related News