वीज पुरवठा खंडीत करु…”; अदानी समूहाची बांग्लादेशाला धमकी

दिल्ली : बांग्लादेशातील राजकराणात होणारे पडसाद शेजारील देशांवर उमटताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर जागतिक स्तरावर पुन्हा एकदा बांग्लादेश चर्चेत येताना दिसत आहे. याच कारण म्हणजे अदानी पॉवर हाऊस. झारखंडमधील फॅक्टरीत कोळश्याचा वापर करुन अदानी समूहाकडून वीजनिर्मिती केली जाते. या फॅक्टरीतून तयार होणाऱ्या विजेचा पुरवठा काही प्रमाणात बांग्लादेशाला केला जातो. सुमारे 1,600 मेगावॅट वीज अदानी समूह बांग्लादेशाला पुरवते. बांग्लादेशमधील राजकीय, सामाजिक आणि आर्थिक स्थिती पाहता, अदानी समूहाने बांगलादेश पॉवर बोर्डाला 7000 कोटी रुपयांहून अधिक कर्ज दिले होते.

या कर्जाची दखल घेण्यासाठी अदानी समूहाने सतत बांग्लादेश पॉवर बोर्डाला अधिकृत नोटीस पाठवली होती. मात्र वारंवार पाठपुरवठा करुनही बांग्लादेश पॉवर बोर्डाची अपेक्षित प्रतिक्रिया आली नाही. त्यामुळे झारखंड अदानी समूहाने याबाबत ठोस भूमिका घेतली आहे. बांग्लादेश दिलेल्या कर्जाची ,दखल घेत नाही हे लक्षात घेत झारखंड अदानी समूहाने वीजेचा करण्यात येणारा पुरवठा निम्याने कमी केला. त्यामुळे बांगलादेशात वीजेअभावी अनेक समस्या निर्माण होऊ लागल्या.

 

Related News

सदर परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेत बांग्लादेश पॉवर बोर्ड नेअदानी समूहाला वीज पुरवठा खंडित न करण्याचं आवाहन केलं. तसंच प्रतिकूल परिस्थिती लक्षात घेत बांग्लादेशने वीज पुरवठा सुरू ठेवण्यासाठी सुमारे 1,450 कोटी रुपयांचे नवीन लेटर ऑफ क्रेडिट (LC) जारी केले आहे.

Related News