श्रीनिवास वनगा 36 तासांनंतर रिचेबल!

शिंदे

शिंदे गटाचे विद्यमान आमदार महायुतीतून तिकीट नाकारल्याने

नाराज होते. दरम्यान, 36 तासांनंतर श्रीनिवास वनगा यांचा

कुटुंबासोबत संपर्क झाल्याची माहितीसमोर येत आहे. मध्यरात्री

Related News

३ वाजता श्रीनिवास वनगा हे घरी आले आणि पुन्हा बाहेर गेले,

अशी माहिती श्रीनिवास वनगांच्या कुटुंबीयांकडून मिळत आहे.

तर प्रकृती ठीक नसल्याने श्रीनिवास वनगा विश्राती घेत असल्याचे

पत्नी सुमन वनगा यांनी सांगितले. दरम्यान, विधानसभेची उमेदवारी

न मिळाल्याने वनगा नाराज होते. अशातच ते नॉटरिचेबल झाल्याचे

पाहायला मिळाले. मध्यरात्री तीन वाजताच्या सुमारास श्रीनिवास

वनगा घरी येऊन आपल्या पत्नीशी चर्चा करून पुन्हा आपल्या

नातेवाईकांकडे गेल्याची माहिती त्यांच्या पत्नीने दिली आहे. सध्या

श्रीनिवास वनगा हे बोलण्याच्या मानसिकतेत नाहीत. त्यामुळे आम्हाला

थोडा वेळ द्यावा, अशी विनंतीच वनगा यांच्या पत्नी सुमन वनगा यांनी

केली आहे. तिकीट नाकारल्याने नाराज झालेले पालघर विधानसभा

मतदारसंघाचे शिंदे गटाचे विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा हे नॉट

रिचेबल झाले होते. अशातच त्यांचा शोध पोलीस पथकांकडून सुरू

होता. अशातच अखेर 36 तासांनी श्रीनिवास वनगांचा कुटुंबियांशी

संपर्क झाल्याचे समोर आले आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/bjps-big-plan-for-assembly-meeting-with-prime-minister-modi-amit-shahgadkari-maidan/

Related News