Pune Nasrapur Case : फोटो आणि CCTV पुरावे पाहताना साक्षीदारांना अश्रू अनावर; नसरापूर प्रकरणातील सुनावणीत भावनिक वातावरण
भोर तालुक्यातील नसरापूर येथे घडलेल्या साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवरील लैंगिक अत्याचार आणि हत्येच्या हृदयद्रावक प्रकरणाची सुनावणी आता निर्णायक टप्प्याकडे वाटचाल करत आहे. पुण्यातील विशेष न्यायालयात शुक्रवारी झालेल्या सुनावणीदरम्यान अनेक भावनिक क्षण अनुभवायला मिळाले. पीडितेच्या आई-वडिलांसह सहा साक्षीदारांनी न्यायालयासमोर आपली साक्ष नोंदवली. मात्र, घटनास्थळावरील छायाचित्रे आणि सीसीटीव्ही फुटेज पाहताना सर्व साक्षीदारांना अश्रू अनावर झाल्याचे चित्र न्यायालयात पाहायला मिळाले.
या प्रकरणातील आरोपी भीमराव प्रभाकर कांबळे (वय ६५) याच्याविरोधात चालू असलेल्या खटल्यात सरकार पक्षाने महत्त्वाचे पुरावे सादर केले असून, आरोपीविरोधातील आरोप अधिक गंभीर करण्यासाठी अतिरिक्त कलम लावण्याची मागणीही न्यायालयाकडे करण्यात आली आहे.
Related News
SCLR Final Phase : 12 वर्षांनंतर अखेर पूर्णत्वाकडे; डबल डेकर ब्रिज, 90 अंशाचा पूल आणि 11 किमी सिग्नल-फ्री प्रवासाने मुंबईकरांना मोठा दिलासा
म...
Continue reading
Heatwave Crisis : उष्णतेचा वाढता कहर; केंद्र सरकार, महाराष्ट्रासह विविध राज्यांना NGT ची नोटीस
नवी दिल्ली : देशभरात वर्षानुवर्षे वाढ...
Continue reading
चंद्रपूर हादरवणारं प्रकरण: पैशांच्या हव्यासापोटी आईचाच अमानुष कारनामा उघड
चंद्रपूर जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि माणुसकीला काळिमा फासणारं प्रकर...
Continue reading
मराठा आरक्षणाचा निर्णायक टप्पा! मनोज जरांगेंच्या उपोषणानंतर सरकारची 5 मोठी आश्वासने
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंचे आमरण उपोषण; सरकारची 5 मोठी आ...
Continue reading
दिपाली सय्यद यांची मुख्य भूमिका : महाराष्ट्रात सध्या चर्चेत असलेल्या कथित “भोंदू खरात” प्रकरणावर आधारित आगामी चित्रपटामुळे मनोरंजन विश्व आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. “म...
Continue reading
VIDEO : बाळाच्या रडण्यामुळे अर्ध्यात थांबला 'लग्नपंचमी'चा प्रयोग; स्वप्नील जोशीच्या संवेदनशील कृतीचं सर्वत्र कौतुक
मुंबई : रंगभूमीवरील कलाकारांस...
Continue reading
मोठा झटका! CNG-PNG दरात पुन्हा वाढ; 31 लाख ग्राहकांवर परिणाम, रिक्षा-टॅक्सी भाडेवाढीची शक्यता
मुंबई महानगर प्रदेशातील (MMR) नागरिकांना पुन्हा एकदा महागाईचा मोठा फटका बसला आहे.
Continue reading
मराठा आरक्षणासाठी निर्णायक संघर्ष; आजपासून अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात आंदोलनाचे नेतृत्व करणारे मराठा आंदोलक
Continue reading
नवी दिल्ली : सिंधू जल करार स्थगित केल्यानंतर भारताने जलव्यवस्थापनाच्या दिशेने आणखी एक मोठे पाऊल उचलल्याची चर्चा रंगली आहे. पाकिस्तानकडे वाहणाऱ्या पाण...
Continue reading
मराठा आरक्षणासाठी निर्णायक लढा; जरांगे पाटील पुन्हा उपोषणावर
“मी उपोषण करणारच” : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मरा...
Continue reading
Pune Nasrapur Case काय आहे संपूर्ण प्रकरण?
भोर तालुक्यातील नसरापूर गावात १ मे रोजी घडलेल्या या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. साडेतीन वर्षांच्या निष्पाप चिमुकलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक तसेच अनैसर्गिक अत्याचार करण्यात आल्याचा आरोप आहे. त्यानंतर आरोपीने तिचा निर्घृण खून केल्याचे तपासात समोर आले.
या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली होती. ग्रामस्थ, सामाजिक संघटना आणि विविध राजकीय पक्षांनी आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली होती. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपासाला वेग दिला आणि काही दिवसांतच आरोपीला अटक करण्यात आली.