मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा सतर्क

मराठा आरक्षण आंदोलनाचे वर्तमानातील प्रमुख नेते मनोज

जरांगे पाटील यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे.

अज्ञात व्यक्तीकडून आलेल्या धमकीमुळे खळबळ उडाली

Related News

असून त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. एका

युट्युब चॅनेलवरबजाज बिश्नोई लीडर नावाच्या फेट अकाऊंटवरुन

केलेल्या कमेंटच्या माध्यमातून ही धमकी आल्याची प्राथमिक

माहिती आहे. पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून सुरक्षा

वाढवली असून धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरु केला आहे.

विधानसभा निवडणुकीत जरांगे पाटील हे आपले उमेदवार उभे

करण्याच्या विचारात आहेत. त्यामुळे त्यांना राजकीयदृष्ट्या

भेटायला येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.

विधानसभा निवडणूक 2024 काळात मनोज जरांगे पाटील

यांना उमेदवारीसाठी इच्छुक म्हणून भेटायला येणाऱ्यांची संख्या

प्रचंड आहे. अशा वेळी आपणही त्यांना इच्छुक म्हणून भेटायला

जाणार आणि त्यांचा गेम करणार अशा आशयाची धमकी बजाज

बिश्नोई लीडर नामक अकाऊंटने दिली आहे. ही धमकी येताच

पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. त्यांना भेटाला येणाऱ्या

प्रत्येकाची कसून चौकशी केली जात आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/ndrf-coast-guard-team-aware-of-chakriwadlacha-fraud-government-agency-hi-alertwar/

Related News