संध्याकाळच्या वेळी अनेक घरांमध्ये नाश्त्यात भेळ किंवा चाट खाल्ले जाते. भेळ खाल्यानंतर पोटही भरते . संध्याकाळच्या नाश्त्यात सगळ्यांचं काहींना काही चटपटीत पदार्थ खायचे असतात. पण असे पदार्थ जे तळलेले किंवा तिखट नसतील. तिखट किंवा तेलकट पदार्थ खाल्यामुळे असिडिटी वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे आज लोक भेळ किंवा सुका खाऊ खातात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये ओट्सची भेळ कशी बनवायची याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. सतत नुसतेच तेच दुधात आणि पाण्यात बनवलेले ओट्स खाऊन कंटाळा आल्यानंतर तुम्ही ओट्सपासून भेळ बनवू शकता. ओट्सची भेळ आरोग्यासाठी खूप पौष्टिक आणि हेल्दी आहे. कमीत कमी साहित्यामध्ये ओट्स भेळ तयार होते. चला तर जाणून घेऊया ओट्स भेळ बनवण्याची सोपी रेसिपी
साहित्य:
- ओट्स
- कांदा टोमॅटो
- चाट मसाला
- लिंबू
- मखणा
- मुरमुरे
- फरसाण
- कोथिंबीर
- मीठ
- चिंच गुळाची गोड चटणी
कृती:
- ओट्स भेळ बनवण्यासाठी सर्वप्रथम कढई गरम करण्यासाठी ठेवा. कढई गरम झाल्यानंतर त्यात ओट्स मंद आचेवर भाजा.
- त्यानंतर कुरमुरे आणि मखाणा भाजून घ्या. भाजून घेतलेले सर्व पदार्थ थंड होण्यासाठी ठेवा.
- मोठ्या बाऊलमध्ये भाजून घेतलेले ओट्स, मखाणा, कुमुरे टाकून मिक्स करा. नंतर त्यात फरसाण टाका.
- नंतर त्यात बारीक चिरून घेतलेला कांदा, टोमॅटो, चिंच गुळाची लाल चटणी, मीठ टाकून मिक्स करा.
- भेळ तयार झाल्यानंतर त्यात सगळ्यात शेवटी कोथिंबीर, चाट मसाला आणि लिंबाचा रस टाकून मिक्स करा.
- तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली ओट्स भेळ.