मुर्तिजापूर, अकोट, अकोला पश्चिममध्ये भाजपची सावध भूमिका

विद्यमान आमदारांसह कार्यकर्त्यांमध्ये धाकधुक वाढली

विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामात भाजपने जाहीर केलेल्या

९९ उमेदवारांच्या पहिल्या यादीत जिल्ह्यातील मुर्तिजापूर आणि

Related News

अकोट मतदारसंघातील विद्यमान आमदारांची नावे नसल्याने

इच्छुक उमेदवारांसह कार्यकर्त्यांमध्ये धाकधुक वाढली आहे.

विशेष म्हणजे भाजपने बहुतांश विद्यमान आमदारांना पुन्हा संधी

देत पहिल्याच यादीत त्यांची उमेदवारी घोषीत केली. मात्र,

जिल्ह्यातील मुर्तिजापूर, अकोट आणि अकोला पश्चिम

मतदारसंघात विद्यमान आमदारांना वाढता विरोध पाहता पक्षाने

सावध भूमिका घेतली असल्याचे बोलल्या जात आहे. विधानसभा

निवडणुकीची आचारसंहिता लागु झाल्यानंतर राज्यातील राजकीय

वातावरण चांगलेच तापले आहे. महायुती आणि महाविकास

आघाडीकडून सक्षम उमेदवारांची चाचपणी केल्यानंतर

मतदारसंघातील स्थानिक इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीचे

सोपस्कार पूर्ण करण्यात आले. विधानसभेच्या या रणसंग्रामात

वंचीत बहुजन आघाडीने सर्वांत आधी राज्यातील अनेक

मतदारसंघात उमेदवारांची घोषणा करून निवडणुकीची रंगत

वाढविली. त्यानंतर भाजपने ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

करून विरोधकांना जोरदार मास्ट्रर स्ट्रोक दिला आहे. भाजपच्या या

यादीत अकोला जिल्ह्यात केवळ अकोला पुर्व मतदारसंघाचे

आमदार रणधिर सावरकर यांच्या उमेदवारीची घोषणा भाजपने

केली असुन मुर्तिजापूर, अकोट आणि अकोला पश्चिम

मतदारसंघातील विद्यमान आमदारांना संधी देणार की नवीन चेहरा

निवडणुकीच्या मैदानात उतरविणार हे गुलदस्त्यात आहे. त्यामुळे

जिल्ह्यातील भाजपच्या विद्यमान आमदारांसह त्यांच्या

कार्यकर्त्यांमध्ये धाकधुक वाढली आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/shock-to-kotak-mahindra-bank-customers/

Related News