पुण्याच्या पिंपरी-चिंचवडमधून लैंगिक शोषणाचा प्रकार समोर
आला आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेने फुगेवाडी परिसरामध्ये
असलेल्या एका शाळेत दोन अल्पवयीन मुलींचे त्या संस्थेतील
Related News
शिक्षण क्षेत्रात नवचैतन्य! इंझोरी केंद्रातील मुख्याध्यापक
चर्चगेट स्थानकाबाहेर बेस्ट बसला आग;
गुलजारपुरा स्मशानभूमी मोजते अखेरच्या घटका
भारताला जपानकडून बुलेट ट्रेनची भेट! मुंबई-अहमदाबाद उच्चगती रेल्वे
अकोल्यात केंद्र सरकारविरोधात काँग्रेसचे तीव्र आंदोलन!
मेरठमध्ये धक्कादायक प्रकार : तरुणाची २५ वर्षांनी मोठ्या विधवा महिलेशी फसवून लग्न
राजस्थानमध्ये भीषण अपघात; वरात घेऊन जाणारी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक….
अकोल्यात पाणी प्रश्न पेटला; शिवसेनेचा जलप्रदाय विभागात घागर मोर्चा, तोडफोड
कोल्हापुरात फुटबॉल सामन्यादरम्यान आयोजकांना पाच हजारांचा दंड
राजकोटमध्ये अपघात; ४ जणांचा मृत्यू, संतप्त नागरिकांचा रस्तारोको
जिल्हा परिषद अकोला : अधिकारी–कर्मचारी, जनतेत तीव्र नाराजी
सुदैवाने जीवितहानी टळली….
एका कर्मचाऱ्याने लैंगिक शोषण केलं असल्याचा संतापजनक
प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणानंतर स्थानिक आमदार
महेश लांडगे हे आक्रमक झाले असून त्यांनी दापोडी पोलीस
ठाण्यामध्ये तातडीने धाव घेत ”आरोपींवर कठोर कारवाई करा,
अन्यथा आमच्या ताब्यात द्या”, अशी मागणी पोलिसांकडे केली
आहे. मात्र, दापोडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश
वाघमारे यांनी संबंधित आरोपीला अटक करण्यात आली असून
त्याला कठोरात कठोर शिक्षा होणार असल्याचे त्यांनी आमदार
लांडगे यांना सांगितले. या प्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापकांनी
दापोडी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद देखील दिली आहे.
सरफराज मन्सूर शेख (वय ३२, रा. कोंढवा पुणे) याच्यावर
बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा
दाखल केला आहे. संबंधित आरोपी शेख हा शाळेतील ॲडमिन
विभागात काम करतो. त्याने ऑगस्ट ते २ ऑक्टोबर २०२४ या
कालावधीत मुलींचे लैंगिक शोषण केल्याचे फिर्यादीत नमूद
करण्यात आले आहे. शाळेतील १३ वर्षीय मुलीने मुख्याध्यापकांना
१५ ऑक्टोबर रोजी भेटून शेख याने बॅड टच केल्याचे सांगितले.
तसेच माझ्याप्रमाणे १५ वर्षीय एका मुलीबाबत देखील शेख याने
असाच प्रकार केल्याचेही पीडित मुलीने मुख्याध्यापकांना सांगितले
आहे. त्यानंतर या प्रकारला वाचा फुटली आणि संपूर्ण प्रकरण पुढे
आले. याबाबत आमदार महेश लांडगे म्हणाले की, ”मुलीच्या
कुटुंबियांना सुरक्षा द्यावी. पीडित मुलीचे कुटुंबीय दबावामध्ये
आहेत. त्यामुळे आरोपीवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे.
ज्यामुळे विकृत प्रवृत्तींना आळा बसेल. नाहीतर सरळ आरोपीला
आमच्या ताब्यात द्या. आम्ही न्याय करू. शहरात अशी घटना पुन्हा
घडणार नाही. अशी जबर शिक्षा आरोपीला झाली पाहिजे”, अशी
आग्रही मागणी महेश लांडगे यांनी केली आहे. याबाबत संबंधित
पोलीस प्रशासनाने कारवाही करु असं सांगितलं आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/took-sutra-to-take-father-ill/