न्या. संजीव खन्ना नवे सरन्यायाधीश!

सरन्यायाधीश चंद्रचूड यांची शिफारस, ११ रोजी शपशविधी

भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड

येत्या 10 नोव्हेंबरला निवृत्त होणार आहेत. त्यांनी देशाचे पुढील

Related News

सरन्यायाधीश म्हणून न्या. संजीव खन्ना यांच्या नावाची शिफारस

केंद्र सरकारला केली आहे. सर्वोच्च न्यायालयातील

सरन्यायाधीशांची नियुक्ती ज्येष्ठताक्रमानं केली जाते.

सरन्यायाधीश हे सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमचे प्रमुख

असतात. ते सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती आणि देशातील

विविध उच्च न्यायालयांच्या न्यायमूर्तींच्या नियुक्तीची शिफारस

करत असतात. धनंजय चंद्रचूड 2 वर्ष त्यांच्या पदावर राहिल्यानंतर

सेवानिवृत्त होणार आहेत. निवृत्तीपूर्वी त्यांनी न्या. संजीव खन्ना

यांच्या नावाची शिफारस केली आहे.

न्या. संजीव खन्ना 11 नोव्हेंबर 2024 रोजी सरन्यायाधीश

म्हणून शपथ घेतील. पुढील सहा महिन्यानंतर ते निवृत्त होणार

आहेत. 13 मे 2025 रोजी ते निवृत्त होणार आहेत. जानेवारी

2019 मध्ये दिल्ली उच्च न्यायालयातून सर्वोच्च न्यायालयात

न्यायमूर्ती म्हणून रुजू झाले होते. सध्या त्यांच्यासमोर कंपनी

कायदा, मध्यस्थता, सेवा कायदा, सागरी कायदा, नागरी कायदा

आणि वाणिज्यिक विषयक कायदा यासंदर्भातील प्रकरण आहेत.

Read also:https://ajinkyabharat.com/raj-thackeray/

Related News