आगामी विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजताच राज्यातील
सर्वच पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. लोकसभा निवडणुकीत
अनेकांना मराठा मतांचा फटका बसला होता. त्यामुळे
Related News
चेहऱ्याचा रंग उजळण्यासाठी सोपे घरगुती उपाय….
कांगो नदीत भीषण बोट दुर्घटना;
फ्लोरिडा विमानतळावर थरारक क्षण;
झारखंडच्या रांचीमध्ये पहिल्यांदाच एअर शो;
दिल्लीतील मुस्तफाबादमध्ये इमारत कोसळली;
पुन्हा ‘ठाकरे विराजमान’? राज ठाकरे यांचा युती प्रस्ताव, उद्धव ठाकरे यांचा सकारात्मक प्रतिसाद!
तापमान वाढीमुळे पोल्ट्री व्यवसायाला फटका;
माकडांच्या टोळक्यांमध्ये भीषण झटापट; रस्त्यावरच दिसला ‘गँगवॉर’सारखा थरार
पत्नीच्या मारहाणीची तक्रार करताच नवऱ्यावरच 307 कलमांतर्गत गुन्हा
पत्नीने आइब्रो सेट केल्याच्या रागातून पतीने केली चोटी कापण्याची धक्कादायक घटना
हरिद्वार-देहरादून महामार्गावर महिलेचा गोंधळ,…
अकोल्यात गुडफ्रायडे भक्तीभावाने साजरा
सावधगिरीचा पर्याय म्हणूनसर्वच पक्षातील आमदार आणि नेते
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे घनसावंगीचे आमदार राजेश
टोपे यांनी मनोज जरांगे पाटील यांची मध्यरात्री भेट घेतली आहे.
रात्री पावणे तीन वाजता राजेश टोपे आणि मनोज जरांगे पाटील
यांच्यात बैठक झाली. अंतरवाली सराटीत ही बैठक पार पडली.
यावेळी राजेश टोपे आणि मनोज जरांगे यांच्यात कोणत्या
विषयावर चर्चा झाली, याची अद्याप कोणतीही माहिती समोर
आलेली नाही. मात्र लोकसभा निवडणुकीत जरांगे पॅटर्न हा
चांगलाच चालला होता. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत
कोणताही फटका बसू नये, यासाठी अनेक नेते हे मनोज जरांगे
पाटील यांची भेट घेत आहेत. राजेश टोपे यांच्या आधी रात्रीच्या
अंधारात राधाकृष्ण विखे पाटील यांनीही मनोज जरांगे पाटील यांची
भेट घेतली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील
यांना भेटण्यासाठी वेगवेगळ्या पक्षातील नेते मंडळी भेट घेत
आहेत. काल रात्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अंतरवाली
सराटीमध्ये जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. या आठ
दिवसात राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांची
दुसऱ्यांदा भेट घेतली आहे. सध्या मनोज जरांगे पाटील यांची भेट
घेण्यासाठी शक्यतो रात्रीची वेळ निवडत आहे. राधाकृष्ण विखे
पाटील यांनीही जरांगेंना भेटण्यासाठी रात्री पावणे दोन वाजताची
वेळ घेतली होती.
Read also: https://ajinkyabharat.com/prodigy-in-indias-food-culture-international-report/