सरकारने डीए वाढवला; कोट्यवधी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट

मोदी सरकारने दिवाळीच्या सणाआधीच देशातील करोडो

कर्मचाऱ्यांना भेट दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या

नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी महागाई भत्ता

Related News

(डीए) जारी करण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली. केंद्रीय

मंत्रिमंडळाने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय घेतला आहे,

मात्र केंद्राकडून ग्रीन सिग्नल मिळताच देशातील सर्व राज्यांमध्येही

महागाई भत्ता वाढीचा निर्णय जाहीर होणार आहे. डीएमध्ये तीन

टक्क्यांनी वाढ करण्यासोबतच कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांची

थकबाकी देण्याची घोषणाही केंद्रीय मंत्रिमंडळाने केली आहे.

केंद्र सरकार दरवर्षी जानेवारी आणि जुलैमध्ये कर्मचाऱ्यांचा

महागाई भत्ता (DA) वाढवते. या वर्षी म्हणजेच 2024 मध्येही

जानेवारीत 4 टक्क्यांनी महागाई भत्ता वाढवण्यात आला होता,

तर आज झालेल्या बैठकीत जुलैसाठी डीए वाढवण्याचा निर्णय

घेण्यात आला.यामुळेच जुलैपासून महागाई भत्त्यातील ही तीन

टक्के आहे. तसेच जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याची

थकबाकीही कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/devendra-fadnavisach-sharad-pawaranna-open-challenge/

Related News