उमर अब्दुल्ला आज घेणार जम्मू कश्मीर च्या मुख्यमंत्री पदाची शपथ

केंद्र शासित प्रदेश जम्मू कश्मीर मध्ये पहिल्यांदाच पार पडलेल्या

विधानसभा निवडणूकीच्या निकालानुसार, उमर अब्दुल्ला आज

मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे. जम्मू कश्मीरला केंद्रशासित

Related News

प्रदेशाचा दर्जा मिळाल्यानंतर मुख्यमंत्री होण्याचा पहिला मान उमर

यांना मिळाला आहे. आज त्यांच्या सोबत एकूण 10 जण

मंत्रीपदाची आणि गोपनीयतेची शपथ घेणार आहेत. हा शपथविधी

सोहळा आज शेर ए कश्मीर इंटरनेशनल कन्वेंशन सेंटर मध्ये

सकाळी 11.30 च्या सुमारास होणार आहे. उपराज्यपाल मनोज

सिन्हा त्यांना शपथ देणार आहेत. उमर यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या

शपथविधीमध्ये इंडिया आघाडीचे अनेक नेते उपस्थिती लावणार

आहेत. सध्या श्रीनगर मध्ये समाजवादी पार्टी चे अध्यक्ष अखिलेश

यादव पोहचले आहेत.कॉंग्रेस प्रमुख मल्लिकार्जुन खरगे आणि

राहुल गांधी देखील दाखल होणार आहेत. दरम्यान उमर यांच्या

शपथविधीसाठी महाराष्ट्रातून सुप्रिया सुळे यांनी विशेष उपस्थिती

लावली आहे. उद्धव ठाकरे यांनाही या सोहळ्याचे आमंत्रण देण्यात

आले होते. मात्र ते कालच हॉस्पिटल मधून डिस्चार्ज झाले

असल्याने या सोहळ्याला अनुपस्थितीत राहतील. जम्मू कश्मीर

मध्ये 90 विधानसभा जागांवर झालेल्या निवडणूकीत नेशनल

कॉन्फ्रेंस ला 42, बीजेपी ला 29, कांग्रेस ला 6, पीडीपी ला 3,

जेपीसी ला 1, सीपीआईएस ला 1, AAP ला 1,जागा मिळाली

आहे. सोबत 7 अपक्ष निवडून आले आहेत.

Read also: https://ajinkyabharat.com/punyala-yellow-alert-today/

Related News