भाजप आमदार राणा जगजित सिंह पाटलांना स्टेजवर रडू कोसळले

काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याच्या आठवणींना उजाळा

धाराशिव तुळजापूरचे भाजपाचे आमदार राणा जगजीत

सिंह पाटील यांना भर स्टेजवर रडू कोसळले. हुंदके देत

Related News

आमदार पाटील यांनी आपल्या अश्रूला वाट मोकळी करून

दिली .त्याच झालं असं की तुळजापूर येथील औद्योगिक

प्रशिक्षण संस्थेला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिक्षण महर्षी सी.

ना आलुरे गुरुजी यांचे नाव देण्यात आलंय. या नामकारणांचा

सोहळा तुळजापूर मध्ये आयोजित करण्यात आला होता.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी आलूरे गुरुजी यांच्या आठवणींना

उजाळा दिला. पाटील आणि आलूरे गुरुजी या दोन कुटुंबांचे

पिढ्यान पिढ्या संबंध होते. त्यांच्या आठवणीने आमदार राणा

जगजित सिंह पाटील यांना भर स्टेजवर रडू कोसळले. आमदार

राणा पाटील हुंदके देऊन रडले. प्रयत्न करूनही त्यांना रडू आवरत

नव्हतं. त्यानंतर त्यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

या घटनेनंतर मात्र कार्यक्रम स्थळी कमालीची शांतता पसरली

होती.

Read also: https://ajinkyabharat.com/badya-netyakudun-vanchitla-invitation/

Related News