गेल्या पाच वर्षांपासून रखडलेल्या राज्यपाल नियुक्त विधानपरिषद
आमदारकीला अखेर आज मुहुर्त मिळाला आहे. गेल्या कित्येक
वर्षांपासून राज्यपाल नियुक्त विधानपरिषद आमदारकीसाठी 12
Related News
भारताला जपानकडून बुलेट ट्रेनची भेट! मुंबई-अहमदाबाद उच्चगती रेल्वे
अकोल्यात केंद्र सरकारविरोधात काँग्रेसचे तीव्र आंदोलन!
मेरठमध्ये धक्कादायक प्रकार : तरुणाची २५ वर्षांनी मोठ्या विधवा महिलेशी फसवून लग्न
राजस्थानमध्ये भीषण अपघात; वरात घेऊन जाणारी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक….
अकोल्यात पाणी प्रश्न पेटला; शिवसेनेचा जलप्रदाय विभागात घागर मोर्चा, तोडफोड
कोल्हापुरात फुटबॉल सामन्यादरम्यान आयोजकांना पाच हजारांचा दंड
राजकोटमध्ये अपघात; ४ जणांचा मृत्यू, संतप्त नागरिकांचा रस्तारोको
जिल्हा परिषद अकोला : अधिकारी–कर्मचारी, जनतेत तीव्र नाराजी
सुदैवाने जीवितहानी टळली….
मुर्तीजापुरात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांनी घेतली गस्त मोहीम हाती
पारंपरिक शेती करताना शेतकऱ्यांना अनेक अडचणी
सानंदांच्या निष्ठावान कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी ( अजित पवार ) मध्ये प्रवेश
आमदारांची नियुक्ती रखडली होती. अखेर आज राज्यपाल
नियुक्ती आमदारकीसाठी 12 पैकी 7 नेत्यांची नियुक्ती करण्यात
आली आहे. आज महाराष्ट्रातील राज्यपाल नियुक्त आमदारांचा
शपथविधी सोहळा पार पडला. दुपारी 12 वाजता
विधानभवनातील सेंट्रल हॉलमध्ये हा सोहळा आयोजित करण्यात
आला. यावेळी उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे या विधानपरिषद
सदस्यांना शपथ दिली. महाराष्ट्राच्या राज्यपाल नियुक्त
आमदारांच्या शपथविधीसाठी विधीमंडळात जोरदार तयारी
करण्यात आली होती. उपसभापती निलम गोरे यांच्या उपस्थितीत
हा शपथविधी पार पडला. राज्यतील विधानसभा निवडणुकांची
आचारसंहिता लागू होण्यापूर्वी महायुती मोठी खेळी करण्यात
आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारकडून राज्यपाल नियुक्त
आमदारांची यादी तयार करण्यात आली होती. या आमदारांच्या
नावांची यादी सोमवारी राज्यपालाकंडे पाठवण्यात आली होती.
त्यानंतर रात्री उशिरा राज्यपालांनी या नावांना मंजुरी दिली आहे.
चित्रा वाघ (भाजप) विक्रांत पाटील (भाजप) बाबूसिंग महाराज
राठोड (भाजप) मनीषा कायंदे (शिंदे गट) हेमंत पाटील (शिंदे गट)
पंकज भुजबळ (अजित पवार गट) इद्रिस नायकवडी (अजित पवार
गट) यांनी शपथ घेतली.
Read also: https://ajinkyabharat.com/air-travel-jhala-swast/