ओमर अब्दुल्ला 16 ऑक्टोबरला घेणार जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला 16 ऑक्टोबरला

मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. जम्मू-काश्मीर विधानसभा

निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर ओमर अब्दुल्ला नवे

Related News

मुख्यमंत्री होणार आहेत. जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज

सिन्हा यांनी ओमर अब्दुल्ला यांना पत्र लिहून वेळ दिली आहे.

पत्रात त्यांनी ओमर अब्दुल्ला यांना सरकार स्थापन करून

मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याचे आवाहन केले आहे. ओमर

अब्दुल्ला 16 ऑक्टोबर (बुधवार) रोजी सकाळी 11:30 वाजता

SKICS श्रीनगर येथे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. मला एलजी

जम्मू आणि काश्मीरच्या कार्यालयाकडून पुढील सरकार स्थापन

करण्यासाठी आमंत्रित करणारे पत्र मिळाले आहे. त्यासाठी 16

ऑक्टोबर ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. मी 16

ऑक्टोबरला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहे, असं ओमर

अब्दुल्ला यांनी आपल्या एक्सवरील पोस्टमध्ये नमूद केलं आहे.

दरम्यान, जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीत नॅशनल

कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीने यावेळी आश्चर्यकारक कामगिरी

केली. या निवडणुकीत एनसीला स्वबळावर 42 जागा मिळाल्या

आहेत. राज्यात काँग्रेसला केवळ 6 जागा जिंकण्यात यश आले.

तथापी, नॅशनल कॉन्फरन्स 90 पैकी 42 जागा जिंकून सर्वात

मोठा पक्ष ठरला. नॅशनल कॉन्फरन्सने जम्मू-काश्मीरमध्ये सरकार

स्थापन करण्याचा दावा केला असून राज्यपालांनी 16 ऑक्टोबरला

सरकार स्थापन करण्यासाठी पक्षाला निवेदन दिले आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/senior-leader-madhukar-pichad-admitted-to-brain-stroke-hospital/

Related News