महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची आज घोषणा

थोड्याच वेळात आयोगाची पत्रकार परिषद

आज (15 ऑक्टोबर) दुपारी 3.30 वाजता केंद्रीय निवडणूक

आयोगाची पत्रकार परिषद पार पडणार आहे. या पत्रकार परिषदेत

Related News

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची घोषणा केली जाणार आहे.

त्यामुळे आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा

कार्यक्रम आज जाहीर करण्यात येणार आहे. एएनआय या

वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय निवडणूक आयोगाची

आज दुपारी पत्रकार परिषद आहे. दुपारी 3.30 मिनिटांनी ही

पत्रकार परिषद सुरू होईल. या पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्रसह

झारखंड विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाईल

अशी माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी

केली जात आहे. त्यातच आता केंद्रीय निवडणूक आयोग पत्रकार

परिषद पार पडत असल्याने सर्वांचेच लक्ष त्याकडे लागले आहे.

महाराष्ट्रातील निवडणूक यंत्रणेची तयारीही अंतिम टप्प्यात सुरु

आहे.

Read also:https://ajinkyabharat.com/election-commission-will-soon-reveal-the-election-date/

Related News