‘सर्व आंबेडकरी नेत्यांनी एकत्र या’, आठवलेंची आंबेडकरांना साद

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्यासह

सर्व आंबेडकरी नेत्यांना एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे.

Related News

तसेच रामदास आठवले यांनी भाजपकडे आगामी विधानसभा

निवडणुतीसाठी 8 ते 10 जागांची मागणी केली आहे. त्यामुळे

महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट आला आहे. रामदास

आठवले यांच्या आवाहनाला प्रकाश आंबेडकर प्रतिसाद देतात

का? ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच महायुतीत

जागावाटपावरुन रस्सीखेच सुरु असताना भाजप रामदास

आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षासाठी जागा सोडणार का?

ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. “रिपब्लिकन पक्ष देशभर

वाढविण्याचा माझा प्रयत्न आहे. फक्त रिपब्लिकनच्या भरवशावर

आपण निवडून येऊ शकत नाही. बाबासाहेबांचा दोन वेळा पराभव

झाला होता. त्यासाठी पक्ष वाढविण्याचा विचार बाबासाहेबांनी

व्यक्त केला होता. आमच्या रिपब्लिकन पक्षात मोठ्या प्रमाणात

गटबाजी मुरलेली आहे. एकेकाळी 9 खासदार होते. वंचित बहुजन

आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आणि इतर नेते माझ्यासोबत

आले असते तर जास्त मंत्री रिपब्लिकनचे असते. मी एकटाच मंत्री

झालो. पण एकमत होत नाही. त्यामुळे नुकसान होते. माझी इच्छा

आहे सगळे रिब्लिकन एकत्रित यावे”, असं आवाहन रामदास

आठवले यांनी केलं आहे. तसेच “प्रकाश आंबेडकर यांनी वंचितच्या

माध्यमातून निवडणूक लढवली, पण त्यांचे उमेदवार निवडून आले

नाहीत. त्यांना मान्यता मिळाली नाही”, असं मत प्रकाश आंबेडकर

यांनी मांडलं.

Read also: https://ajinkyabharat.com/life-disrupted-due-to-untimely-rains-in-mumbai/

Related News