संभाजी भिडेंकडून पीएम मोदींवर स्तुतीसुमने

वारंवार आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असणारे

शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी काल (गुरूवारी)

सांगलीत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं आहे.

Related News

तर गांधी-नेहरुंच्या विचारावर टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र

मोदी हे देव माणूस आहेत. त्यांनी 370 कलम रद्द केले, आता

पाकव्याप्त काश्मीर परत घेतील अशी आशा बाळगूया असं म्हणत

त्यांनी गांधी नेहरुंच्या विचाराने देशाचा नरक झाला आहे, म्हणत

त्यांनी हल्लाबोल केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देव माणूस

आहेत. मोदींच्यासारखे कणखर पंतप्रधान देशाला लाभले आहेत.

त्यांच्यामूळे काश्मिरमधील 370 कलम रद्द झाले आहे. आता ते

पाकव्याप्त काश्मीर परत घेतील अशी आशा बाळगूया असे

शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी म्हटलं आहे. पेठ

येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या

अनावरण कार्यक्रमात संभाजी भिडे बोलत होते. छत्रपती शिवाजी

महाराज व धर्मवीर संभाजीराजे यांचे विचार सोडून आपण गांधी –

नेहरुंचे विचार आत्मसात केल्याने देशाचा नरक झाला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी देवमाणूस आहेत, त्यांच्या मातोश्रींचं कौतुक

करावं तितकं थोडं आहे. त्यांनी 370 कलम रद्द केलं. आता पाक

व्याप्त काश्मीर परत घेतील, असं म्हणत त्यांनी मोदींवर कौतुकांचा

वर्षाव केला आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/two-agniveerans-died-in-nashik-while-loading-tophat-balls/

Related News