दापोलीतील कुणबी भवनाच्या जागेवरून आता भाजप आणि
शिवसेना शिंदे गटाच्या वादात या भूखंडासाठी शिवसेनेचे आमदार
योगेश कदम आणि भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाण हे दोन नेते आमने-
Related News
उद्योगांमधून सोडले जाणारे प्रदूषित पाणी रोखण्यासाठी कडक नियम लवकरच लागू
एसटी बसमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न
नाशिकमध्ये आरोपी ‘क्रिश’ची थरारक पलायनकथा
“पाकिस्तानच्या विनाशापर्यंत दाढी-मिशी नाही”
जातनिहाय जनगणनेसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय
इंस्टाग्रामवरील सुपरस्टार्स
मुख्यमंत्र्यांची लेक दिवीजा दहावीत चमकली
29 ऑगस्टला मुंबईत आमरण उपोषण!
फळांचा राजा गणराया चरणी!
नेहानेच अट घातली होती’; मेलबर्न शो वादावर आयोजकांचा आणखी खुलासा, काय म्हणाली नेहा कक्कर?
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्याच्या दरात घसरण; खरेदीसाठी सुवर्णसंधी
दादरमधील नाबर गुरुजी विद्यालयाच्या बंदतेने मराठी शाळांचे भविष्य अधांतरी
सामने आले आहेत. एकाच दिवशी कुणबी भवनाच्या दोन
जागांच्या उद्घाटनावरून भाजप आणि शिंदे जुंपणार असल्याचं चित्र
तयार झालं आहे. विधानसभा निवडणुकीसाठी आता सर्वच
राजकीय पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे. महाविकास आघाडी
आणि महायुती सध्या जागा वाटपावरून चर्चा सुरू असून मराठा
कुणबी ओबीसी आरक्षणाचा मुद्दा राज्यभर तापला आहे. दरम्यान
रत्नागिरीत कुणबी भवनाच्या भूमिपूजन सोहळ्याला राजकीय रंग
लागण्याची चिन्हे आहेत. एकाच दिवशी कुणबीभवनाच्या दोन
जागांचे उद्घाटन होणार असून विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर
दापोलीतील या भूखंडाचा वादामुळे भूमिपूजन सोहळ्याला
राजकीय रंग लागण्याची चिन्हे आहेत. आता शिवसेनेचे आमदार
योगेश कदम आणि भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाण दोन वेगवेगळ्या
ठिकाणी कुणबी भवनाच्या भूखंडाचे भूमिपूजन करणार आहेत.
त्यामुळे एकाच दिवशी दोन जागांच्या उद्घाटनावरून दापोलीत
भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या वादाला नवी राजकीय
फोडणी मिळाल्याची चर्चा आहे. दरम्यान उमेदवार बदलून
मागणाऱ्या भाजपच्या केदार साठेंवर आमदार योगेश कदम यांनी
जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले मी ज्या संस्थेला जागा दिली
ती मातृसंस्था आहे. भाजपकडून कुणबी समाजात फूट पाडण्याचा
प्रयत्न सुरू असल्याचं शिंदे गटाचे योगेश कदम म्हणालेत. मला
राजकारण करायचे नाही असेही ते यावेळी म्हणाले.
Read also: https://ajinkyabharat.com/nasrallah-eliminates-11-hezbollah-commanders/