मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
टाटा समूहाचे अध्यक्ष रतन टाटा यांचे बुधवारी (09 ऑक्टोबर)
निधन झाले. आजारामुळे त्यांना सोमवारी रुग्णालयात
दाखल करण्यात आले होते. यानंतर त्यांची प्रकृती गंभीर झाल्याची
बातमी समोर आली होती. रक्तदाब अचानक कमी झाल्याने त्यांना
मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नंतर
त्यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना अतिदक्षता विभागात
हलवण्यात आले, तेथे त्यांचा मृत्यू झाला.
7 ऑक्टोबर रोजी एका सोशल मीडिया पोस्टमध्ये, त्यांनी
आरोग्यविषयक चिंता ‘अफवा’ म्हणून फेटाळून लावल्या आणि
त्याच्या अनुयायांना आणि चाहत्यांना सांगितले की काळजी
करण्यासारखे काही नाही आणि वय-संबंधित वैद्यकीय स्थितींसाठी
त्यांची चाचणी केली जात आहे. त्यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त
करण्यात येत आहे.