देवीच्या दर्शनासाठी गेलेल्यांवर काळाचा घाला

बस आणि कारच्या अपघातात तिघांचा जागेवरच मृत्यू

जळगाव जिल्ह्याच्या चोपडा तालुक्यातून एक अपघाताची मोठी

बातमी समोर आली आहे. यात बस आणि कारच्या समोरासमोर

Related News

झालेल्या अपघातात कार मधील तिघांचा जागेवर मृत्यू झाल्याची

घटना घडली आहे. जळगाव जिल्ह्यात चोपडा तालुक्यातील

चोपडा-धरणगाव रस्त्यावर चोपडा सुत गिरणी जवळ ही

अपघाताची घटना घडली आहे. कारमधील वाणी कुटुंब

जळगावमधील मनू देवीच्या दर्शनासाठी जळगाव जिल्ह्यात येत

असताना हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे. घटनेची

माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठत पुढील तपास सुरू

केला आहे. तर यातील एकावर नजीकच्या रुग्णालयात उपचार

सुरू आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार चोपडा-नाशिक ही

शिवशाही बस चोपडा बस आगारातून सकाळी सहा वाजता

निघाली. दरम्यान ही बस वाटेत असताना चोपड्या पासून पाच

किमी अंतरावर असलेल्या सूतगिरणी जवळ समोरून येणाऱ्या कार

आणि बसचा जोरदार अपघात झाला. यावेळी कारमधील तिघांचा

जागेवर मृत्यू झालाय, तर एक जण गंभीर जखमी झाला असून

त्याच्यावर चोपडा शहरात उपचार सुरू आहेत. कारमधील वाणी

कुटुंब जळगावमधील मनू देवीच्या दर्शनासाठी जळगाव जिल्ह्यात

येत असताना हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेने

परिसरात मात्र एकच खळबळ उडाली आहे. सध्या पोलिसांनी

घटनास्थळ गाठत पुढील तपास सुरू केला आहे. मात्र या घटणेमुळे

मृतांच्या कुटुंबियांवर दुखा:चा डोंगर कोसळला आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/srirampurchaya-maji-amradas-women-atrocities-case-stuck/

Related News