महाराष्ट्रात येत्या दोन-चार दिवसात आचारसंहिता!

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांनी मोठी

तयारी सुरू केली आहे. मात्र, निवडणुकांचं बिगुल वाजण्याच्या

सर्वजण प्रतीक्षेत आहेत. राजकीय पक्षांनी देखील मोठी तयारी

Related News

केली आहे, सभा, दौरे, पक्षांतर, भेटीगीटी, उमेदवारांची चाचपणी

देखील सुरू आहे, अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार

यांनी निवडणुकीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. दोन चार दिवसात

आचारसंहिता लागणार आहे. तुम्ही निवेदन दिल्यावर ते काम मार्गी

लागण अवघड आहे असं अजित पवारांनी आज म्हटलं आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत आज उद्योग मेळाव्याचे

आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बोलताना अजित पवार

म्हणाले, दोन चार दिवसात आचारसंहिता लागणार आहे. तुम्ही

निवेदन दिल्यावर ती मार्गी लागणं अवघड आहे. बारामतीचे

वातावरण चांगले ठेवण्यासाठी आपण 30 वर्ष प्रयत्न करीत

आहोत. लोकसभेला जे काही झालं ते विसरून जाऊ. सगळ्यात

जास्त निधी मी बारामतीला दिला आहे. आजपर्यंत आपण

घड्याळाचे बटन दाबत आलेलो आहोत परंतु अपवाद लोकसभेचा

आहे लोक विधानसभेला घड्याळाच्या चिन्हासमोरच बटन दाबून

त्या उमेदवाराला विजयी करा असं आवाहन अजित पवारांनी

यावेळी केलं आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/31-people-died-due-to-dengue-in-last-9-months-in-india/

Related News