कृषी विभाग आणि यूनिवर्स एक्सपोर्ट्सच्या माध्यमातुन आंतरराष्ट्रीय खरेदीदार शेतकऱ्यांच्या बांधावर

विदर्भातील कृषी उत्पादनांच्या निर्यातीसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल

उचलत, युनिव्हर्स एक्सपोर्टचे संस्थापक प्रविण वानखडे यांनी

दुबईच्या आणि दक्षिण आफ्रिकेचे अवर वेलनेस व्हिलेजच्या डॉ.

Related News

रीना सुकदेव यांना आमंत्रित केले, शेतकऱ्यांचे उत्पादन

आंतरराष्ट्रीय बाजारात पोहोचवण्यासाठी डॉ. सुकदेव यांनी

शेतकऱ्यांच्या शेतावर थेट भेट देऊन निर्यातीसंबंधित चर्चा केली.

त्यांच्या या दौर्यामध्ये महत्वाची भूमिका कृषि विभाग नागपुर यांची

राहीली वर्ध्यातील विविध शेतकरी उत्पादक कंपन्यांसोबत चर्चासत्र

आयोजित करण्यात आले आहे, ज्यात वायगाव एफपीसी, विदर्भ

नैसर्गिक एफपीसी, कृषिकोन्नती एफपीसी, आणि राणवारा

एफपीसी सहभागी झाल्यात. या चर्चासत्रानंतर वायगाव व इतर

शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या हळदीच्या शेतीला भेटी दिल्या.

त्यानंतर नागपूर जिल्ह्यातील मोहपा येथील नवअनंत शेतकरी

उत्पादन कंपनीच्या संत्रा मोसंबी क्लिनिंग, ग्रेडिंग, वाशिंग आणि

वॅक्सिंग युनिटला भेट देऊन पाहणी केली, कळमेश्वर जामगाव

आणि काटोल येथील कोल्ड स्टोरेज व संत्रा मोसंबीच्या शेतावर

भेट देण्यात आली. तसेच संत्रा उत्पादक शेतकऱ्यांशी चर्चा

करण्यात आली. जागतिक नामांकन असलेली वायगाव हळद

आणि नागपूरच्या संत्र्याची व मूल्य जोडलेले उत्पादनची

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जास्त मागणी आहे, तसेच येणाऱ्या

हंगामात दुबई येते निर्यात करनार असे डॉ. रीना सुकदेव म्हनाले.

प्रविण वानखडे शेतकऱ्यांच्या हितासाठी सातत्याने काम करत

आहेत आणि त्यांनी विदर्भातील शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनांची

आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून दिली आहे. या सर्व

उपक्रमांमुळे विदर्भातील शेतकऱ्यांना निर्यात प्रक्रियेत सक्रियपणे

सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन मिळाले असून, त्यांच्या

उत्पादनांची मागणी स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत

वाढली आहे. कृषि विभाग नागपुर येथील विभागीय नोडल

अधिकारी स्मार्ट प्रकल्प च्या प्रज्ञा गोड़घाटे, प्रकल्प

संचालक आत्मा नागपूर च्या डॉ अर्चना कडू, जिल्हा नोडल

अधिकारी स्मार्ट नागपूर चे अरविंद उपरिकर, स्वाती

गावंडे, सत्यपाल ठाकरे, बलराम बलगमवार, पंकज गिरडे, नितेश

वानखेडे आणि यूनिवर्स एक्सपोर्ट्स सहकारी मध्यमा सवाई, नेहा

मेश्राम, प्रशिक आनंद, नक्षित्रा रायपूरे, दीप चौधरी, गीतेश निमजे,

प्रज्वल रायबोले आदि उपस्थित होते.

Read also: https://ajinkyabharat.com/maldives-president-muizzoo-met-delhi-prime-minister-modi/

Related News